Solapur Politics : सोलापूर महापालिकेच्या सभेत राजकीय संस्कृतीचं दर्शन, महापौरांना मागे घ्यावा लागला पाकीट शब्द
सोलापूर महानगरपालिकेची मंगळवारी सायंकाळी सर्वसाधारण सभा सुरू असताना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर भाजप विरोधात आंदोलन केलं. महाविकास आघाडीतील काँग्रेस नगरसेवकांनी मात्र सभागृहात भाजपने मांडलेल्या विषयाला मूकसंमती दर्शवली. भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. भाजपने मांडलेल्या विषयाला सभागृहात काँग्रेसकडून समर्थन मिळाले आहे. मात्र बाहेर शिवसेना (उबाठा) आणि मनसे नेत्यांनी आंदोलन केलं आहे. त्यावर भाजपचे महापौर विनायक कोंड्याल यांनी उत्तर दिले, बाहेरच्या आंदोलनाकडे लक्ष देऊ नका, बाहेर आंदोलन करणारे हे पाकीट घेऊन आंदोलन करतायत.