• Thu. Jun 18th, 2026

    सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 12, 2026
    सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.

    यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

    या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.

    000

    मोहिनी राणे/स.सं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed