• Wed. Jun 10th, 2026

    ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वितरणास सुरुवात – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 12, 2026
    ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वितरणास सुरुवात – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या सन २०२३  मधील ग्रंथांचे वितरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण  मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधीच्या ‘ग्रंथभेट’ योजनेंतर्गत २०२४-२५  या वर्षासाठी राज्य ग्रंथालय नियोजन समितीने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार २०२३  मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून निवड प्रक्रिया पार पडली आहे. राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीमार्फत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील निवडक ग्रंथांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे येथे करण्यात आली असून या ग्रंथांचे वितरण सुरू झाले आहे.

    या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ९४० शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये तसेच ६० मध्यवर्ती कारागृह ग्रंथालये अशा एकूण १ हजार लाभार्थी ग्रंथालयांना ग्रंथांचा लाभ देण्यात येणार आहे. ग्रंथपार्सल वितरणाचे काम टपाल खात्यामार्फत शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे येथून सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथांचा जास्तीत जास्त वाचकांना लाभ मिळावा यासाठी संबंधित ग्रंथालयांनी हे ग्रंथ  दर्शनी विभागात ठेवावेत, अशा सूचना ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात आल्या आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

    000

    काशीबाई थोरात/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed