छत्रपती संभाजीनगर: ड्रोन आणि आयएफडी पॅनेल निर्मितीच्या मोठ्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सैन्य दलातून निवृत्त झालेल्या एका सुभेदारासह त्यांच्या नातेवाईकांची तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कोल्हापूरच्या कंपनी संचालकांसह पुण्यातील एका प्रसिद्ध सीए दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीसोबतच ३८ लाख रुपयांचे धनादेश बाऊन्स झाल्याचे आणि बनावट लेखी करारपत्र केल्याचेही तपासात समोर आले आहे. सुभेदार किशोर देवसिंग बरंडवाल (वय ५४, रा. मुकुंदवाडी) यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये सुभेदार बरंडवाल यांची ओळख त्यांचे मित्र नितीन गोटपगार यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरातील के ट झेड ट्रेडर्स या कंपनीच्या संचालकांशी झाली होती. कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दरमहा १५ टक्के इतका मोठा परतावा मिळेल, असे मोठे आमिष संचालक जलील नूरुद्दीन किरणगी, सचिन सिताराम झेपले आणि वैभव खामकर यांनी बरंडवाल व त्यांचे नातेवाईक पवनकुमार पवार यांना दाखवले. या आमिषाला बळी पडून त्यांनी सुरुवातीला २९ लाखांची गुंतवणूक केली.
तब्बल १ कोटी ७० लाख उकळले; पुण्यातील सीए दाम्पत्याची एण्ट्री
३ फेब्रुवारी २०२२ ते ५ ऑगस्ट २०२२ या काळात संशयित जलील किरणगी याच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर बरंडवाल आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकूण १ कोटी ७० लाख रुपयांची रक्कम वर्ग केली. यानंतर आरोपींनी नेक्स्टटेक व्हिजन प्रा. लि.या नवीन कंपनीचे शेअर्स देण्याचे आमिष दाखवले. यामध्ये पुण्यातील सीए दाम्पत्य सुशांत फडणवीस व शिल्पा सुशांत फडणवीस यांनीही बरंडवाल यांचा विश्वास संपादन केला.
परतावा बंद, ३८ लाखांचे चेकही बाऊन्स
१९ ऑक्टोबर २०२३ पासून कंपनीकडून परतावा मिळणे अचानक बंद झाले. बरंडवाल यांनी पैशांची मागणी लावून धरल्यानंतर, आरोपींनी २ जानेवारी २०२३ रोजी २ कोटी ३७ लाख ७८ हजार ५५० रुपयांचा परतावा व बोनस देण्याचे नवीन लेखी करारपत्र करून दिले. मात्र, या करारानंतरही पैसे न देता आरोपींनी दिलेले १८ लाख आणि २० लाख रुपयांचे (एकूण ३८ लाख) धनादेश बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले. मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून जलील नूरुद्दीन किरणगी, सचिन सिताराम झेपले, वैभव खामकर, शिल्पा सुशांत फडणवीस व सुशांत शरदचंद्र फडणवीस अशा ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा