Virar Crime : टेकड्यांच्या एका फोटोला ‘झूम’ केले असता, झाडाला लटकलेली गोष्ट ही एखादी व्यक्ती असावी असे तरुणाला वाटले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर : डोंगराळ भागातील निसर्गरम्य दृश्याचे फोटो एका तरुणाने काढले. नंतर मोबाईलमधील फोटो झूम करुन पाहिला असता, त्याला झाडाला लटकलेली एक बॉडी दिसली. पालघर जिल्ह्यात विरार तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मांडवी परिसरातील काशीद कोपर भागात असलेल्या कुलस्वामी माता मंदिराच्या जवळ ही घटना घडली. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डोंगराच्या माथ्यावरून ते शव ताब्यात घेतले.
मंदिराजवळ फोटो काढताना तरुणाला काय दिसलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी २५ वर्षीय दक्ष पाटील मंदिराच्या परिसरात फोटो काढत होता. हे फोटो पाहताना, त्याने परिसरातील टेकड्यांच्या एका फोटोला ‘झूम’ केले असता, त्याला झाडाला लटकलेली गोष्ट ही एखादी व्यक्ती असावी असे वाटले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दक्षने तात्काळ मांडवी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलीस स्थानिक नागरिकांसह घटनास्थळी दाखल झाले. Jalgaon Accident : दैवदुर्विलास! कारची बाईकला धडक, गाडीतील वरमाय-वरपित्याचा करुण अंत, तर लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही एकत्रच शेवट
आधार कार्डद्वारे ओळख पटली
प्राथमिक तपासादरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. बॉडीजवळ सापडलेल्या आधार कार्डमुळे मृताची ओळख पटली. तो उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला ३४ वर्षीय लालमोहन पारस चौहान असल्याचे निष्पन्न झाले आहे. बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली असून, त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा शोध घेण्याचे काम अधिकारी करत आहेत.
Uday Samant On Bacchu Kadu | CM Fadnavis यांच्यावर बच्चू कडूंच वक्तव्य,मंत्री सामंत थेटच बोलले
पोलिसांनी सांगितले की, तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास अधिकारी सर्व पैलूंची पडताळणी करत असून, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. London Marathi family Death : लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत, 36 व्या मजल्यावरुन पडल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू, यूकेमध्ये नाव कमवलेली अदिती परळकर कोण होती?
अनोख्या पद्धतीने बॉडी आढळली
बॉडी ज्या पद्धतीने आढळून आली, म्हणजेच ये-जा करणाऱ्या लोकांच्या नजरेस पडण्याऐवजी एका ‘झूम-इन’ केलेल्या फोटोद्वारे ती सापडली, त्यामुळे स्थानिक पातळीवर या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तपास सुरू असतानाच, मृत व्यक्तीच्या अलीकडील ठावठिकाण्याविषयी माहिती असलेल्या कोणाकडेही काही माहिती असल्यास त्यांनी पुढे येऊन ती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा