• Mon. Mar 9th, 2026
    Accident News : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोघांचा करुण अंत; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

    Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड-घाटनांद्रा रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    सिल्लोड घाटनांद्रा माहामार्ग अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-घाटनांद्रा मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. भराडी गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे सिल्लोड परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

    ज्ञानेश्वर नारायण शेळके (वय 35, रा. धामणी, ता. सिल्लोड) आणि राहुल मधुकर दाभाडे (वय 38, रा. सिल्लोड) असं मयत झालेल्या तरुणांचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आपल्या दुचाकीवरून क्रमांक एमएच 20 एचजे 1873 सिल्लोड-घाटनांद्रा रस्त्याने जात होते. भराडी गावाच्या पुढे एका हॉटेलजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
    Maharashtra TimesHSC Board Exam: बारावीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी; मदत करणारे मास्तरही CCTVमध्ये कैद, 19 जणांवर कारवाई

    नागरिकांची मदतीसाठी धाव

    अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणांना मदत करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. धडक देऊन अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस आता या वाहनाचा शोध घेत आहेत.

    मुलाच्या जाचाला कंटाळून जन्मदात्या आईनेच संपवला वंश

    रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना लासूर स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका आईनेच त्याच्या हत्येचा कट रचला आणि 30 हजार रुपयांची सुपारी देऊन त्याचा काटा काढला. शहानवाजपूर येथील एका विहिरीत आढळलेल्या त्या बेवारस मृतदेहाचे गूढ शिल्लेगाव पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे उकललं आहे.
    Maharashtra TimesImtiaz Jaleel : ‘घोटाळे बाहेर काढले म्हणून मला अडकवलं’; इम्तियाज जलील यांचा पालकमंत्री संजय शिरसाटांवर थेट प्रहार

    जावई कमलसिंग सिंगल (रा. टाकळीवाडी) आणि जावयाचा मित्र गोरख शेकू अहिरे (रा. एकभुर्जी वाघलगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी शहानवाजपूर शिवारातील एका विहिरीत अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. विशेष म्हणजे, हा मृतदेह दोरीने बांधून पांढऱ्या पन्नीमध्ये गुंडाळलेला होता आणि तो पाण्याखाली राहावा यासाठी त्यात दगड भरले होते. यावरून हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले होते, परंतु मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होतं. पण पोलिसांनी अखेर या हत्येचं गूढ उकललं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा