Pune Bridges: शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी शहरात रेल्वे फाटक हटवून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्याच्या कामांना आता वेग मिळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) यांची जलद उभारणी होणार आहे. त्यामुळे पुणे महानगरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. त्याकरिता ‘पीएमआरडीए’ आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) यांच्या सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी रेल्वेफाटकमुक्तीकरिता विशेष पुढाकार घेतला होता. याबाबत पूर्वी झालेल्या बैठकांत रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल आणि भुयारी मार्ग यांची कामे वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत करण्याऐवजी या कामांमध्ये तांत्रिक अनुभव असलेल्या ‘महारेल’मार्फतच करून घ्यावीत, असे आदेश दिले होते. ‘पीएमआरडीए’ अंतर्गत हे प्रकल्प ‘महारेल’कडे सोपविण्याच्या दृष्टीने दोन्ही संस्थांमध्ये बैठका पार पडल्या. ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, डॉ. अभिजित चौधरी यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
Navi Mumbai International Airport: विमानतळावर सहा महिन्यातचं पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण; ‘प्रवाशांची दिशाभूल होतेय’
पुण्यातील रस्ते रेल्वेफाटकमुक्त होणार
करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक रस्ते रेल्वेफाटकमुक्त होणार आहेत. रेल्वे फाटकांमुळे रस्त्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा आता इतिहासजमा होणार आहेत. नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. यामुळे पुण्यातील प्रकल्पांच्या कामांना वेग मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतही झाल्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास डॉ. अभिजी चौधरींनी व्यक्त केला आहे.
पुण्यात दीड लाख ‘स्मार्ट कार्डां’चे वितरण
शैक्षणिक वर्ष दोन सुरू झाले असून, विद्यार्थ्यांनादेखील ‘एनसीएमसी कार्ड’ बंधनकारक करण्यात आले आहे. नेमण्यात आलेली वितरण केंद्रे विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन कार्ड देणार आहेत. ही प्रक्रिया वेगाने होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शाळांनीदेखील पुढाकार घेतल्यास विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
Pune-Bengaluru Highway: पुणे-बंगळुरू महामार्गावर कोंडी फुटणार, कराड पुलाचं काम अंतिम टप्प्यात; कुठून-कुठे मार्ग?
पुणे विभागात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे तीन लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केला आहे. त्यापैकी दीड लाख कार्डांचे वितरण पूर्ण झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एक ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक; तसेच ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) बंधनकारक करण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा