Buldhana Accident: सासुरवाडीवरुन घरी परततांना ३० वर्षीय जावयाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं बुलढाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडलं?
महेश कडुबा लोढे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे सासूरवाडीला भेट दिल्यानंतर महेश आपल्या गावी मेहकर तालुक्यातील मोहदरी येथे कारने (एमएच-२८-बीक्यू-२४१८) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जात होते. बुलढाणा ते चिखली मार्गावर साखळी फाट्याच्या अलीकडे पैनगंगा नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रकने (बीआर-०६-८४१२) कारला धडक दिली. या अपघातात महेश यांचा मृत्यू झाला.
Yavatmal Crime : फोन केला की बस स्थानकात भेट, मुख्याध्यापकाची धमकी, सातवीतील मुलीवर कारमध्ये अत्याचार; रात्री 11 वाजता कॉल आला अन्…
घटनेची माहिती समजताच बुलढाणा ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महेश यांचे काका केशव माधवराव लोढे यांच्या फिर्यादीवरून पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनीता खंडारे यांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Yavatmal News: पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य? यवतमाळच्या शाळेतील घटनेची भाजपकडून तक्रार
तर दुसऱ्या एका घटनेत, वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चुलता आणि पुतण्याचा मृत्यू झाला.
हा अपघात शनिवारी मध्यरात्री उमरगा (जि. धाराशिव) बायपासवर झाला. पोलिसांनी सांगितले, की मूळज (ता. उमरगा) येथील रहिवासी बालाजी पांडुरंग बिराजदार (वय ४८) आणि पुतण्या कुणाल शिवाजी बिराजदार (वय २३) हे शनिवारी रात्री नातेवाईकांना सोडण्यासाठी उमरगा चौरस्ता येथे गेले होते. रात्री बाराच्या सुमारास ते दुचाकीवरुन गावी निघाले होते. उमरग्याजवळील कोरेगाव पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिली. धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. दुसरा गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून जखमीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळित झाली.
