• Tue. Sep 22nd, 2026
Beed : PSI पल्लवी जाधवांची लग्न मंडपात धाड, नवरदेवानं पळ काढला; १०० वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कपिलधार येथील मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले.विवाह सोहळा पार पडला होता परंतु पोलीस आल्याचे पाहताच नवरदेवाने मात्र मंडपातूनच पलायन केले.या प्रकरणात वधू वराचे आई-वडील जवळचे नातेवाईक वऱ्हाडी मंडळी यांच्यासह १०० जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असून हे रोखण्यासाठी पोलीस व सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतात. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पलायन केलेल्या नवरदेवाचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed