बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी बांगलादेशातील सव्वा कोटी हिंदूंना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : बांगलादेशात हिंदूंवर वारंवार हल्ले केले जात आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू समाजाचे नागरीक प्रचंड दहशतीत जगत आहेत. अनेक हिंदू नागरीक, विद्यार्थ्यांची भर रस्त्यात हत्या केली जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांगलादेशात अत्याचार सोसणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू समाजाला उद्देशून सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी बांगलादेशातील सव्वा कोटी हिंदूंना अत्याचाराच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. बांगलादेशातील सव्वा कोटी हिंदू जर आपल्या हक्कांसाठी उभे राहिले तर जगभरातील हिंदू त्यांना मदत करतील, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाच्या नागरिकांच्या सुरक्षेवर भाष्य केलं. “बांगलादेशमधील हिंदू आपल्या अधिकारांसाठी उभे राहिले आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचा निर्णय घेणार असतील तर संपूर्ण जगातील हिंदूंची त्यांना साथ मिळेल”, असं मोहन भागवत म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समाजाच्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदू समाजाच्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना जास्त वाढल्या. भारत विरोधी कट्टरपंथी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली. त्यानंतर हिंसा आणखी भडकली होती. या हिंसेत बांगलादेशातील विविध भागांमधील हिंदू नागरीक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना लक्ष केलं गेलं. या हिंसेत अनेक हिंदू नागरिकांचा जीव गेला.
संघाचा सरसंघचालक हा हिंदू असेल, मोहन भागवत यांचं वक्तव्य
दरम्यान, मोहन भागवत यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक हा हिंदू असेल. मग तो एसटी किंवा एसटीचा देखील असू शकतो, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. “सरसंघचालक कोण बनावा? कुणी ब्राह्मण संघाचा सरसंघचालक बनू शकत नाही. कुणी क्षत्रिय, वैश्य किंवा क्षुद्र बनू शकत नाही. जो हिंदू आहे तोच सरसंघचालक बनेल. सरसंघचालक हा एससी, एसटी आहे तरी बनू शकतो किंवा दुसरा असेल तरी बनू शकतो. आम्ही हे पाहून आमच्या इथे कार्यकर्ता नियुक्ती करत नाहीत”, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा