राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पार पडत आहे.या परीक्षेला जाताना परीक्षार्थी महिलांना एका अत्यंत कठीण अनुभवाला सामोरे जावे लागले. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विवाहित महिलांना चक्क त्यांची मंगळसूत्रे आणि अंगावरील दागिने काढून बाहेर ठेवण्यास सांगितलं.कुठल्याही प्रकारचे धातूचे साहित्य आत नेता येणार नाही,असे सांगत सुरक्षारक्षकांनी महिलांना दागिने काढण्याच्या सूचना केल्या. दागिने काढल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे महिलांची मोठी अडचण झाली.ज्या महिला एकट्या आल्या होत्या, त्यांच्यासमोर एवढे महागडे दागिने कुठे ठेवायचे असा मोठा प्रश्न उभा ठाकला होता. परीक्षेच्या तणावात भर टाकणाऱ्या या अजब नियमामुळे केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.