• Fri. Jun 19th, 2026

    CCTV समोर तरुणीसोबत मध्यरात्री बळजबरी

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    CCTV समोर तरुणीसोबत मध्यरात्री बळजबरी

    छत्रपती संभाजीनगर 

    छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यभागी असलेल्या नागेश्वरवाडी भागामध्ये रात्रीच्यावेळी एक तरुण एका तरुणीला बळजबरी करत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली नसल्यानं या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    तरुणीवर जबरदस्ती

    मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील नागेश्वरवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी होस्टेल करून राहतात. याच परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास एक तरुण एका तरुणीला बळजबरी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरुणी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना देखील तरुण तिला उचलून नेत असल्याचं या सीसीटीव्ही मधून दिसत आहे. मात्र, व्हिडिओच्या शेवटी तरुण-तरुणी निघून गेले आहेत. दरम्यान, याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांना याविषयी विचारलं असता याप्रकरणी कुठलीच तक्रार प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. या व्हिडिओमुळे पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मुलींना सुरक्षित भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अशा तरुणांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, आता क्रांती चौक पोलीस नेमकी काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

    लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर तीन वर्ष अत्याचार

    मोटार ट्रेनिंग स्कूल चालवणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील तळोजा भागात उघडकीस आला आहे. आरोपीच्या विरोधात बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तळोजा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. यानंतर पीडितेने ४ फेब्रुवारी रोजी तळोजा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या ३५ वर्षीय आरोपीचे नाव किरण पावशे असून तो नवी मुंबईतील तळोजा भागात राहतो. पीडित महिलाही याच भागात राहते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed