BMC Mayor New Car: सध्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसाठी इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी असून तीच महापौरांसाठी खरेदी करण्यात आली आहे.
महापौरांच्या दिमतीला ३० लाख रुपये किंमतीची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी असणार आहे. उपमहापौरांसह सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांच्या दिमतीला स्कॉर्पिओ एन ही गाडी असणार आहे. स्कॉर्पिओला भगव्या रंगाच्या पट्ट्या असतील.
Mumbai Mayor: मुंबई सोडून जाऊ नका! भाजप, शिवसेना उबाठा पक्षाकडून नगरसेवकांना आदेश
मुंबईच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ११ फेब्रुवारीला पार पडेल. त्यानंतर स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, बेस्ट समिती अध्यक्षांच्या निवडणुका होतील आणि नंतर विशेष समित्यांसह १८ प्रभाग समित्यांच्या निवडणुका पार पडतील. ते रुजू होताच त्यांना दैनंदिन वापरासाठी नवीन वाहने उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यामध्ये केवळ महापौरांच्या सेवेत टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड वाहन असेल.
BMC Election : उद्धव ठाकरेंची नवी खेळी, महापौरपदाच्या निवडणुकीत तगडा शिलेदार उतरवणार, आकड्यांचा चमत्कार घडणार?
तर उपमहापौरांसह, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, तीन वैधानिक समिती अध्यक्ष, सहा विशेष समिती अध्यक्ष यांच्यासाठी स्कॉर्पिओ एन हे वाहन सेवेत असणार आहे. स्कॉर्पिओ वाहनांच्या दोन्ही बाजूला भगव्या पट्ट्यांचे डिझाइन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांची वाहने सहज ओळखता येतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने एका दिली.
मुंबईत १८ प्रभाग समित्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्षांना पिवळ्या नंबर प्लेट असलेली भाडेतत्त्वावरील वाहने उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौर, उपमहापौर, विविध समिती अध्यक्षांसाठी वाहनांची खरेदी आणि भाडेतत्त्वावरील वाहने उपलब्ध करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले आहेत.
Sunetra Pawar यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, गृह मंत्रालयाला सूचना, महायुती सरकारची विशेष खबरदारी
खरेदी प्रक्रिया पूर्ण
या वाहनांची खरेदी प्रक्रिया ही मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे. महापौरांच्या इनोव्हाच्या समोरच्या दिशेने महापौरांचे नाव आणि मुंबई महापालिकेच्या लोगोचा वापर करण्यात येणार असून त्याचे आरेखनही तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
