• Fri. Mar 6th, 2026
    अलिकडे घडलेल्या अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे मी यावेळी… शरद पवारांनी 58 वर्षांचा शिरस्ता चुकवला, नेमकं काय झालं?

    Ajit Pawar Death : सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी ‘सहयोग’मध्ये दाखल होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर शरद पवार नतमस्तक झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेट जाऊन घेतली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतल्याने या भेटीला राजकीय; तसेच भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी या भेटीपूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी ‘सहयोग’मध्ये दाखल होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर शरद पवार नतमस्तक झाले.

    सहयोग सोसायटी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निवासस्थान आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी देशभरातून मान्यवर, कार्यकर्ते आणि समर्थक येत आहेत. संपूर्ण पवार कुटुंब सहयोग सोसायटीत एकत्र आले.
    Maharashtra TimesHemalata Patil : अजित दादांनी 27 तारखेला मला शब्द दिलेला, त्यांचं निधन होताच घाणेरडं राजकारण, NCP नेत्याचा गंभीर आरोप
    या वेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. भेटीच्या पार्श्वभूमीवर सहयोग सोसायटी येथे कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सत्ता, कुटुंब आणि दुःख या तिन्ही पातळ्यांवर महत्त्वाची ठरणारी ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नवे संकेत देणारी मानली जात आहे.

    अर्थसंकल्पाला प्रथमच अनुपस्थित

    महाराष्ट्र विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या तिन्ही सभागृहांत गेली ५८ वर्षे कधीही गैरहजर न राहिल्याचा ठाम दावा करत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय चर्चाना थेट उत्तर दिले. ‘सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणे ही माझी परंपरा आहे. मात्र अलीकडे घडलेल्या अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे यावेळी उपस्थित राहता आले नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘अजित पवार यांच्या स्मारकाबाबत मला सध्या अधिक माहिती नाही. सर्वांनी एकत्र बसूनच निर्णय घ्यावा लागेल,’ असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

    ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत माझे नाव घेतले, त्या चर्चेत माझे नाव कुठेच नव्हते. ती चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,’ असे ते म्हणाले.

    Ajit Pawar यांच्या सह्योग निवासस्थानी नाशिकच्या आश्रमातील मुलं पोहोचली, दादांना वाहिली श्रद्धांजली

    ‘सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. मी त्यांना खुशीने आशीर्वाद देईन,’ असे पवार यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या प्रश्नावर पवारांनी मौन राखले.
    Maharashtra TimesBMC Election : उद्धव ठाकरेंची नवी खेळी, महापौरपदाच्या निवडणुकीत तगडा शिलेदार उतरवणार, आकड्यांचा चमत्कार घडणार?

    बंद दाराआड भेट

    अजित पवार यांच्या स्मारकाची चर्चा सुरू असताना, शरद पवार यांनी मात्र ‘या संदर्भात माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नाही,’ असे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळातच, विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थ-जय पवार आणि विजया पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर जय पवार यांची अजित पवार यांच्या अंत्यस्थळी भेट दिली. या घडामोडींमुळे स्मारकाचा विषय राजकीय वारशाच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा