• Mon. Jun 15th, 2026
    Mumbai Mayor: मुंबई सोडून जाऊ नका! भाजप, शिवसेना उबाठा पक्षाकडून नगरसेवकांना आदेश

    मुंबई : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक ११ फेब्रुवारीला होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी मुंबई सोडून जाऊ नये, असे आदेश भाजप आणि शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे जारी करण्यात आले आहे.

    मुंबईच्या महापौरपदी कोणाची नियुक्ती होणार, याचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीत खलबते सुरू आहेत. स्थायी, सुधारसह अन्य महत्त्वाच्या समित्यांचे वाटपही निश्चित झालेले नाही. त्यातच ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी ७ फेब्रुवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

    Sunetra Pawar यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, गृह मंत्रालयाला सूचना, महायुती सरकारची विशेष खबरदारी
    ७ आणि ८ फेब्रुवारीला शनिवार-रविवार आहे. त्यातच कोकणातील सुप्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या जत्रेला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक नगरसेवकही या जत्रेला जात असतात. या सर्व पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबईबाहेर अथवा गावी जाऊ नये, असे पक्षादेश भाजप आणि शिवेसना (उबाठा) पक्ष यांच्याकडून काढण्यात आले आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे कोणाला मुंबई सोडून गावी जावे लागलेच तर १० फेब्रुवारीला शहरात उपस्थित रहा, असेही आदेशात म्हटले आहे.

    Maharashtra TimesBMC Election : उद्धव ठाकरेंची नवी खेळी, महापौरपदाच्या निवडणुकीत तगडा शिलेदार उतरवणार, आकड्यांचा चमत्कार घडणार?
    महापौर निवडणूक व समित्यांच्या निवडणुका होईपर्यंत मुंबईबाहेर कोणीही जाऊ नये, यासाठी नगरसेवकांसाठी व्हीप काढला आहे. संबंधितांवर कारवाई केली जाईल. -किशोरी पेडणेकर, गटनेत्या, शिवसेना (उबाठा)

    परवानगीशिवाय मुंबईबाहेर न जाण्याच्या सूचना आम्ही नगरसेवकांना दिल्या आहेत. भाजपला महापौर निवडणुकीवेळी काही अडचण नाही. महापौर-उपमहापौर निवडणूक होईल आणि तीन दिवसांनी वैधानिक समित्यांचे काम सुरू होईल. त्यामुळे कोणीही परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नये, असे सांगितले आहे. – गणेश खणकर, महापालिका गटनेते, भाजप

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed