BMC Fine: मुंबई महापालिकेने अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडाची रक्कम वाढवली आहे. नवीन उपविधीनुसार नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी हे पाऊल उचलले आहे.
‘मुंबईतील घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने, मुंबई महानगरात निर्माण होणाऱ्या किंवा आणल्या जाणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रिया यासंबंधी सर्व बाबींचे नियमन करण्याच्या हेतूने तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६च्या पार्श्वभूमीवर, महापालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी-२०२५ जारी करण्यात आला आहे’, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी सांगितले.
Railway Budget: 48 मिनिटांत मुंबई-पुणे, लोकल-कोकण रेल्वेच्या फेऱ्या वाढणार; दोन बुलेट ट्रेन… राज्यातील रेल्वेला 23 हजार कोटींचं बूस्ट
उपविधीतील नियम कचरा निर्माण करणारे सर्व व्यक्ती, सार्वजनिक व खासगी ठिकाण; निवासी, व्यापारी, वाणिज्यिक, व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय, निमशासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, धार्मिक, मनोरंजनात्मक, सामाजिक तसेच इतर सर्व प्रकारच्या वापराच्या स्थळांसाठी लागू असतील.
BMC Standing Committee: स्थायी, सुधार समितीत सत्ताधाऱ्यांची सद्दी, मुंबई महापालिकेत महायुतीसाठी बहुमताचा मार्ग मोकळा; काय आहे नवा प्लॅन?
दंड किती ?
- खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ (रु. ३००), लघवी करणे (रु. ५००), शौच करणे (रु.५००), मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे (रु.५००), सार्वजनिक ठिकाणी भांडी, कपडे, इतर कोणत्याही वस्तू धुणे (रु.३००), वाहन धुणे (रु.५००)
- कचरा वर्गीकरण न करता व स्वतंत्र डब्यांमध्ये साठवून न ठेवता सुपूर्द केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी (वैयक्तिक रु. २०० आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांसाठी रु. १०००)
- अनधिकृत किंवा नियुक्त नसलेल्या ठिकाणी बांधकाम व पाडकाम कचरा अस्ताव्यस्तपणे टाकणे (प्रतिवाहन रु. २०,०००), विनापरवाना बांधकाम व पाडकाम कचऱ्याची वाहतूक करणे (प्रतिवाहन रु. २५,०००)
- बागेतील कचरा व झाडांची छाटणी निर्दिष्ट केल्याप्रमाणे न करणे (रु.२००), व्यावसायिक कारणांसाठी / मोठ्या प्रमाणात कचरा जाळणे (रु.१०,०००)
- मासे, कुक्कुटपालन आणि मांसविषयक कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करून न देणे (रु.७५०), कंटेनर, कचरा टोपली, कचरापेटी नसलेले विक्रेते, फेरीवाल्यांसाठी (रु.७५०), कचरा स्वतंत्रपणे वर्गीकरण करून न देणारे विक्रेते, फेरीवाले (रु.७५०)
- घरासमोरील गटार (घराचा नाला) स्वच्छ न ठेवणे (रु.५००), पाळीव प्राण्यांनी कचरा पसरवणे/शौच करणे (रु.१०००), सार्वजनिक मेळावा, कार्यक्रमानंतर ४ तासांच्या आत स्वच्छता न केल्यास स्वच्छता ठेव जप्त करणे अशी कारवाई होईल.
