• Wed. Aug 12th, 2026

    चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजाचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 12, 2026

    मुंबई, दि. १२ : चिल्ड्रन एड सोसायटीचे  २०२६-२०२७ हे शताब्दी वर्ष असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सोसायटीकडील कामकाजाचा आढावा घेतला. मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे यांनी  चिल्ड्रन एड सोसायटीच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने काढण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत जागा उपलब्धेतनुसार या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामाचा सुधारित आराखडा सादर करण्याबाबतही त्यांनी सूचित केले.

    या बैठकीत रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढणे कार्यकारी समितीची बैठक नवीन आकृतीबंद प्रस्ताव पाठवणे यासह माटुंगा येथील कर्मचारी वसाहतीमधील जागेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

    ०००

    एकनाथ पोवार/स.सं.

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed