• Fri. Sep 18th, 2026

घरात कोणीच नव्हतं, व्यावसायिकानं संधी साधली;

ByMH LIVE NEWS

Feb 2, 2026
घरात कोणीच नव्हतं, व्यावसायिकानं संधी साधली;

रत्नागिरी 
रत्नागिरी शहरात एका व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. शहरातील जोशी पाळंद येथील एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. केदार श्रीकृष्ण जोशी (50, रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.रत्नागिरी शहर परिसरात फॅब्रिकेशन वेल्डिंगचा त्यांचा व्यवसाय होता. केदार श्रीकृष्ण जोशी (50, रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) असे या व्यवसायिकाचे नाव आहे. जोशी यांनी अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घरात कोणीही नसल्याची संधी साधत केदार जोशी यांनी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. केदार जोशी हे विवाहित असून फॅब्रिकेशन व्यवसायात होते. दरम्यान सकाळी ९ वा. सुमारास त्यांचा भाऊ घरी आला असता त्याला केदार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. जोशी यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्ये मागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed