• Sat. Mar 7th, 2026
    Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व हरपलं; बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

    DCM Ajit Pawar Death Plane Crash: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. बारामतीत विमान लँड होत असताना हा अपघात झाला असून महाराष्ट्राचं समाजमन सुस्न झालं आहे.

    बारामतीतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बारामती: बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे.

    अजित पवार हे आज सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळले. या अपघातात अजित पवारांसह इतर तीन जणांचा मृत्यू झाला.

    अनेक वर्ष महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या अजितदादांसारख्या नेत्याच्या अकाली मृत्यूने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील जनता शोकसागरात बुडाली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा