Mumbai Malad Station Murder News : मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांच्या हत्येतील संशयिताला अटक करण्यात आली आहे. आलोक सिंगची बहीण पूजा सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा सिंग पुढे म्हणाल्या की, ‘त्यांनी त्याला लहानपणापासून वाढवलं. आम्ही एकत्र शाळेत जायचो. जर कोणी काही म्हटले तर तो म्हणायचा, ‘बहीण, बघ.’ ही त्याची चूक नव्हती. तरीही, त्यांनी त्याच्या पोटात मारले.’
Alok Singh Death : आलोकच्या गर्भवती पत्नीचा टाहो, दिग्गज नेत्याची काळीज चिरणारी पोस्ट; महिलांसमोर अपमानाच्या रागाने ओमकार सणकला, पण…
‘त्या’ दिवशी त्याच्या पत्नीचा वाढदिवस
पूजा सिंग म्हणाल्या की, ‘आलोक खूप सरळ होता आणि त्याने कधीही कोणाशी भांडण केलं नाही. तो त्याच्या कामाबद्दल प्रामाणिक होता. तो अलिकडेच निवडणूक ड्युटीवर होता आणि तो मला नेहमी काहीही अडचण असली की प्रश्न विचारण्यासाठी फोन करायचा, पण आता कोणीही फोन करणार नाही’, असं सांगताना पूजा सिंग यांचा कंठ दाटून आला.
आरोपीबद्दल पूजा सिंग काय म्हणाल्या?
‘त्याच्यात अजिबात माणुसकी नव्हती. आम्ही दोघं भावंडे मुंबईत राहत होतो. आमचे संपूर्ण कुटुंब उत्तर प्रदेशात राहते. आम्ही तासन्तास गप्पा मारायचो. कधीकधी आम्ही दोन महिनेही बोलत नसायचो. पण जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा आम्ही खूप बोलायचो. तो नेहमी म्हणायचा, ‘दीदी, तू बरोबर आहेस. आता हे सर्व माझ्याशी कोण बोलणार?’
Malad Railway Station Murder : मी घरी वाट पाहत होते, पण फोन आला की… आलोकच्या बायकोने क्षण अन् क्षण सांगितला, नेमके एक तास लवकर निघाले कारण…
ओंकार शिंदे काय म्हणाला?
शनिवारी मालाड स्टेशनवर आलोक सिंग आणि ओंकार शिंदे यांच्यात वाद झाला. ओंकारने त्याच्याकडे असलेल्या धारदार वस्तूने त्याच्यावर वार केले आणि तो पळून गेला. चौकशीदरम्यान, आरोपी ओंकारने पोलिसांना सांगितलं की, ‘मला माहिती नव्हतं, त्यांचा मृत्यू होईल’. आरोपी मालाडमधील त्रिवेणी नगरमध्ये त्याच्या आई-वडिलांसह आणि मोठ्या भावासोबत राहत होता. त्याचा मोठा भाऊ एका खासगी कंपनीत काम करतो. त्याचे वडील हृदयरोगी आहेत.
