• Fri. Mar 6th, 2026
    Jalna Crime: दुचाकीवरुन आले, रस्त्यात गाठलं अन् धाड धाड धाड.., तरुणाला संपवलं; जालन्यात दहशत

    Jalna Youth Murder Case: जालना शहरात तरुणावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटने समोर आली आहे. या तरुणावर 3 गोळ्या फायर करत त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने जालन्यात एकच खळबळ माजली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना: जालना शहरात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर अंदाधुंद फायरिंग केली. यामध्ये त्याला तीन गोळ्या लागल्या आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (23 जानेवारी) रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

    एका तरुणावर हल्लेखोरांचा गोळीबार

    मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात कदिम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. येथे एका तरुणावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग केली. हे सर्व दुचाकीवरुन आले होते. गोळीबारात तीन गोळ्या लागल्याने तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी प्रसार माध्यमांना दिली होती.
    Maharashtra TimesCrime News: बाजारात गाठलं अन् सर्वांसमोर दिराने विधवा वहिनीला संपवलं; पळून जाताना कुत्री मागे लागली, काहीच अंतरावर…

    रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

    घटनेनंतर या तरुणाला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तीन गोळ्या लागल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सदरची घटना ही शुक्रवारी 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली असून शहरातील घाटी मध्यवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याची माहिती आहे. संपूर्ण जालना शहरासह परिसरात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि एकच भीतीचे वातावरण पसरले. तरुणाला या हल्लेखोरांनी का मारले हीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
    Maharashtra TimesCrime News: बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला संपवलं, रात्रभर बॉडीशेजारी बसून ‘तसले’ VIDEO पाहिले, सकाळी म्हणाली – त्यांना तर…
    पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सध्या या अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे. जखमी तरुणाचे नाव चरण रायमलू असे असल्याचं पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे. त्याचा मृतदेह सध्या जिल्हा रुग्णालयातील शवागरात ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून अज्ञात हल्लेखोरांचा पोलिस सध्या शोध घेत आहेत. मात्र अधिकृत माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना देणे टाळले आहे. मात्र, अशाप्रकारे एका तरुणावर सर्वांदेखत गोळ्या झाडण्यात आल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा