Raigad Vashi Naka Gas Cylinder Blast : रायगडमधील वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. पिकअप टेम्पोमध्ये असलेल्या अनेक सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुदैवाने या गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिलेंडरचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात उडाल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावरून सुरक्षित अंतर राखत पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने वेळेत दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं, अन्यथा आजूबाजूच्या परिसराला, वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असता.
Metro Line 2B : ‘मेट्रो लाईन 2B’वर ‘शून्य पूल’, मुंबईत पूर्व – पश्चिम जोडणारा 130 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रीज नेमका कुठे?
महत्त्वाची बाब म्हणजे, अशाप्रकारे आगीची ही पहिलीच घटना नाही. ऑक्टोबर 2025 मध्येही वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरशी संबंधित दुर्घटना घडली होती. अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा अशी गंभीर घटना घडल्याने गॅस सिलेंडर वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमांचं पालन होतं का, सिलेंडर वाहतुकीसाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते का, असे सवाल उपस्थित होत, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Fire Brigade Vehicle Burnt : नागपुरात डम्पिंग यार्डला आग, विझवताना फायर ब्रिगेडचं वाहन खाक!
या घटनांमुळे वाशी नाका परिसरात सिलेंडर स्फोटांची जणू मालिका सुरू असल्याचं आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून, गॅस सिलेंडर वाहतुकीसाठी जे नियम आहेत, त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
