• Mon. Jun 15th, 2026
    Pune Election : पुण्यात 5 उमेदवारांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा पराभव, तर 5 उमेदवारांना मतांचा अथांग सागर, भाजपचे चार शिलेदार काठावर नापास, पाहा कोण?

    म.टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे निवडणुकीच्या रिंगणात नुसती हवा असून चालत नाही, तर ती मतांमध्ये रूपांतरित व्हावी लागते आणि लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते, हे पुणे महापालिकेच्या निवडणुकीने पुनश्च अधोरेखित केले आहे. काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रतिस्पर्धांना अक्षरशः चारी मुंड्या चीत करून ‘विराट’ विजय मिळवला; तर काही प्रभागांत मांमधील फरक इतका कमी होता, की उमेदवारांनी श्वास रोखून शेवटच्या फेरीपर्यंत झुंज दिली. जनमताच्या या रंजक कौलाने अधोरेखित केलेले ‘सर्वांत मोठे’ आणि ‘सर्वांत छोटे’ विजय!

    मतांचा महापूर

    सर्वाधिक मताधिक्य असलेल्या पहिल्या पाच जागांवर नजर टाकल्यास पाचही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवारांना मिळालेली मते आणि त्यांच्या प्रतिस्पध्र्थ्यांना मिळालेल्या मतांमधील मोठा फरक या प्रभागांमध्ये पक्षाची लाट असल्याचे अधोरेखित करतो. भाजपच्या दोन महिला उमेदवारांनीही ‘रेकॉर्डब्रेक’ मते घेतल्याचे दिसून येते.प्रभाग २५ (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग
    राघवेंद्र मानकर (भाजप) : ३१ हजार ९८१
    समीर गायकवाड (शिवसेना उबाठा):५४८४
    मताधिक्य :२६ हजार ९४७

    प्रभाग ४ (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    रत्नमाला सातव (भाजप) : ४१ हजार ५१४
    वसुंधरा उबाळे (राष्ट्रवादी काँग्रेस) :१८ हजार ३७८
    मताधिक्य : २३ हजार १३६

    प्रभाग २५ (क) सर्वसाधारण महिला
    स्वरदा बापट (भाजप) : २६ हजार ४८०
    राधिका कुलकर्णी (राष्ट्रवादी काँग्रेस) : 3 हजार ७९९
    मताधिक्य : २२ हजार ६८१

    प्रभाग ३७ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
    बाळा धनकवडे (भाजप) : २६ हजार ९४१
    कैलास भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) : 5 हजार ५२३
    मताधिक्य: २१ हजार ४१८

    प्रभाग ४ (अ) अनुसूचित जाती
    शैलजित बनसोडे (भाजप): २० हजार ५४१
    नानासाहेब आबनावे (राष्ट्रवादी काँग्रेस) : १८ हजार ०४३
    मताधिक्य : २० हजार ५४१

    निसटत्या विजयातून काठावर पास

    सर्वांत कमी मताधिक्य असलेल्या सहा जागांपैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरच्या क्षणी बाजी मारली आहे, तर दोन जागांवर भाजपने निसटता विजय मिळाला आहे. या पाचही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. विजयी उमेदवाराने शेवटच्या क्षणापर्यंत आपली मते बांधून ठेवण्यात यश मिळवले आणि अगदी निसटता का होईना; पण विजय खेचून आणला.

    प्रभाग १७ (अ) अनुसूचित जाती
    खंडू लोंढे (भाजप) : १४ हजार २२३
    अशोक कांबळे (राष्ट्र‌वादी काँग्रेस) :१४ हजार १६८
    मताधिक्य :५५

    प्रभाग २२ (ङ) सर्वसाधारण
    विवेक यादव (भाजप) :१२ हजार ४२३
    अविनाश बागवे (काँग्रेस): १२ हजार ३६१
    मताधिक्य ६२

    प्रभाग २ (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग
    रवी टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) : १५ हजार ३२१
    सुधीर वाघमोडे (भाजप) : १५ हजार १८३
    मताधिक्य : १३८

    प्रभाग २३ (क) सर्वसाधारण महिला
    लक्ष्मी आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) : १२ हजार ६४१
    ऋतुजा गडाळे (भाजप) : १२ हजार ५००
    मताधिक्य : १४१

    प्रभाग ७ (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
    अंजली ओरसे (राष्ट्रवादी काँग्रेस) : १४ हजार ३२७
    सायली माळवे (भाजप) :१४ हजार १११
    मताधिक्य : २१६

    प्रभाग २८ (क) सर्वसाधारण
    सूरज लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) : ११ हजार ४५४
    विनया बहुलीकर (भाजप) : ११ हजार २२६
    मताधिक्य: २२८

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed