• Fri. Jun 19th, 2026
    Jalgaon  Municipal Election Result : बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटक, जेलमधून निवडणूक लढवली; कोल्हे कुटुंबाच्या तीन पिढ्या विजयी

    Jalgaon Municipal Election Result : जळगावच्या प्रभाग 11 मधून माजी महापौर ललित कोल्हेंचा विजय झाला आहे. त्यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

    जळगाव महापालिका निवडणूक ललित कोल्हे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल सुरू असताना जळगावमधून महत्त्वाची बातमी समोर आली. महायुतीचे उमेदवार तथा माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाग क्रमांक 11 मधून दणदणीत विजय मिळवला असून, त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे यांनीही विजयाचा गुलाल उधळला आहे. कोल्हे कुटुंबातील या तिन्ही सदस्यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी जळगावात मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं.

    ‘माझे पती तुरुंगात आहेत’

    या विजयानंतर माध्यमांशी बोलताना ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांना अश्रू अनावर झाले. आपल्या मुलाची, पियुषची गळाभेट घेताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सरीता कोल्हे म्हणाल्या की, ‘माझे पती तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अतिशय घृणास्पद आरोप करण्यात आले होते. पण आज आमच्या मतदारांनी मतांच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे. हा विजय सत्याचा आणि जनतेच्या प्रेमाचा आहे.’Maharashtra TimesJalgaon Municipal Election Result : जळगावमध्ये भाजपची जोरदार सुरुवात, पहिलं खातं उघडलं, राजेंद्र घुगे पाटील विजयी, तर…

    पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरुन

    बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरुन अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे नऊ दिवसांपासून पोलीस कोठडीत होते. त्यानंतर आता त्यांना न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव तुरुंगात पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरुन कोल्हे यांची भेट नाशिक काहागृहात रवानगी करण्यात आली आली होती. मनसे भाजप आणि खान्देश विकास आघाडी अशा राजकीय प्रवासानंतर ललित कोल्हे शिंदेसेनेत स्थिरावले आहेत.
    Maharashtra TimesJalgaon Municipal Election Result 2026 : जळगाव महापालिकेत कोणाचा झेंडा फडकणार? संकटमोचक गड राखणार? की एकनाथ खडसे वरचढ ठरणार

    पिता-पुत्रांनी मिळवला विजय

    पियुष कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढवली होती तर लिलत कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्याच कुटुंबातील सिंधू कोल्हे यांनीही विजय मिळवला आहे. पिता-पुत्राचा विजय शिवसेना शिंदे गटाचे नेते सरिता कोल्हे यांचे आनंदाश्रू अनावर झाले आहेत.

    प्रमुख गटांमध्ये लढत

    दरम्यान, आज जळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. जळगाव महापालिकेच्या 63 जागांसाठी काल गुरुवारी मतदान झालं आहे. एकूण 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे 19 प्रभागांमधील एकूण 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जळगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात जास्त आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. जळगाव महापालिकेमध्ये महापालिकेत महायुतीच्या उमेदवारांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी, अशा दोन प्रमुख गटांमध्ये लढत दिसून आली. अन्य आघाड्या व अपक्षही मैदानात आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा