छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. सध्याच्या कलांनुसार, इथे भाजपला चांगलं यश मिळताना दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि एमआयएम यांच्या आघाडीवर असणाऱ्या जागांची संख्या जवळपास सारख्या दिसत आहेत.
या निवडणुकीत भाजपच्या इच्छुकांनी प्रचंड गोंधळ घातल्याचं बघायला मिळालं होतं. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी देखील प्रचंड आक्रोश केलेला बघायला मिळाला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर थेट मंत्र्यांची गाडी अडवल्याचा प्रकार बघायला मिळाला होता. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर आंदोलन केलेलं बघायला मिळालं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर दोन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे गेले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप संधी होती, अशी चर्चा होती. या निवडणुकीत ठाकरे गटाला किती यश मिळतं? याकडे सर्वांचं लक्ष होतं. शहरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक सभा पार पडली. पण शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचा पाहिजे तसा पराभव करण्यात ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. याउलट ठाकरेंची शिवसेना क्रमांक चारचा पक्ष शहरात ठरताना दिसत आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 56 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट 14 जागांवर आघाडीवर आहे. तर एमआयएम पक्ष 24 जागांवर आघाडी असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना शहरात 15 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर ठाकरे गट 6 जागांवर आघाडीवर दिसत आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, राष्ट्रवादी शरद पवार गट 1, वंचित बहुजन आघाडी 4 तर इतर 1 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरनगरमधील प्रतिष्ठेच्या लढतीत काय घडलं?
- शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी प्रभाग क्रमांक 29 मधून आपलं नशीब आजमावलं होतं. या ठिकाणी त्यांचा विजय झाला आहे.
- संजय शिरसाट यांच्या कम्या हर्षदा शिरसाट यांनीदेखील निवडणूक लढवली. त्यांचादेखील प्रभांग क्रमांक 18 मधून विजय निश्चित मानला जात आहे.
- आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल प्रभाग क्रमांक 15 मधून पिछाडीवर आहेत.
- आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार प्रमोद राठोड, विजय औताडे, सत्यभामा शिदे, बाळासाहेब मुंडे हे विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर निकाल 115/ 83 :
- भाजप : 56
- शिवसेना : 14
- शिवसेना UBT : 6
- एमआयएम : 24
- काँग्रेस : 1
- राष्ट्रवादी : 0
- राष्ट्रवादी SP : 1
- वंचित बहुजन आघाडी – 4
- इतर – 0
(टीप : जसे निकाल येत आहेत तशी आम्ही माहिती अपडेट करत आहोत)
