मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
“अलिकडच्या काळात काही लोकं म्हणायला लागले की, देव खरंच आहेत की नाही? असा प्रश्न अनेकांना पडायला लागला. देवाची खिल्ली काही लोकं उडवायला लागले. पण जाऊद्या त्यांच्याबद्दल मी फार बोलणार नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की, नाशिक शहरात जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता केवळ भाजपमध्ये आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“माझी खिल्ली उडवली गेली. म्हणाले, नाशिक दत्तक घेतलं होतं त्याचं काय झालं? खऱ्या अर्थाने हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं की, नाशिक दत्तक घेतोय. त्यानंतर मी तक्रार केली नाही. मी नाशिक दत्तक घेतलं 2017 साली. त्यानंतर 2019 साली मी विरोधी पक्षनेता झालो. मला दोनच वर्ष मिळाली. मी त्याची तक्रार केली नाही. कारण आम्ही तक्रार करणारे लोकं नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
BNMC Election 2026 : भाजपने बिनविरोध खातं उघडलं, काँग्रेस अन् समाजवादीही सज्ज, भिवंडीत अटीतटीच्या लढत, वाचा उमेदवारांची A टू Z यादी
“कोरोना काळात उबाठा, मनसे, काँग्रेसचे नेते घरी बसले होते त्यावेळी देवाभाऊ आला होता, या ठिकाणच्या प्रत्येक कोविड सेंटर आणि आयसीयूमध्ये जाणारा देवाभाऊ होता. मला तुम्हाला विचारायचं आहे की, तुम्ही कितीवेळा नाशिकला आले? मी वर्षातून चारवेळा नाशिकला येतो. तुम्ही कितीवेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की, नाशिकला विसरायचं, अशा पद्धतीचं निवडणूक पर्यटन आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पर्यटन करणारी ही लोकं आहेत”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
Thane Municipal Election Candidate List : ठाणेकरांनो तुमच्या कामाची बातमी! महापालिका निवडणुकीतील A टू Z उमेदवारांची यादी इथे वाचा
“काळजी करु नका. आजही नाशिकसोबत माझं नातं तेच आहे. या नाशिकची जबाबदारी आम्ही घेतली आहे. नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती. त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही. ज्यावेळेला कुंभमेळ्याची वेळ आली तेव्हा हात वर केला. आमच्याकडे कमी वेळ होता. पण आम्ही 2015 च्या वेळी सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने दिला. कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला. हा कुंभमेळा एकमेव कुंभमेला आहे, ज्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. हे लोकं कुंभमेळ्याची खिल्ली उडवणारे लोकं आहेत. गंगेचं पाणी पिणार नाही असं बोलतात आणि गोदा तिरी येऊन भाषणं करतात, अशा पद्धतीचं काम करणारे हे लोकं आहेत”, अशी टीका फडणवीसांनी केली.
