kolhapur Marathi News : राधानगरी तालुक्यात तरसंबळे जंगलात प्रेमप्रकरणातून नैराश्य येऊन २८ वर्षीय तरुण आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वीची ही घटना असून पोलिस तपास सुरू आहे.
राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरसंबळे गावचे पोलिस पाटील गुरुनाथ गणपती कांबळे यांना आज सकाळी एका व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्यात धामोड-दुर्गमानवाड रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत जंगलात संशयास्पद मृतदेह आढळल्याची माहिती देण्यात आली. खातरजमा करण्यासाठी पाटील घटनास्थळी पोहोचले, तेथे एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या ओंकार बरगे आणि अल्पवयीन मुलीचे मृतदेह आढळले. दोघेही एकाच दोरीने एकत्र बांधले गेले होते. मृतदेहांभोवती दुर्गंधी येत असल्याने चार दिवसांपूर्वीच आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
Kolhapur Political News : कोल्हापूरध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील धनुष्यबाण हाती घेणार
पाटील कांबळे यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांना वर्दी दिली. पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जठार आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी धावले. राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच शवविच्छेदन केले. दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार झाले.
Kolhapur Crime : ‘तुला बाळ होत नाही, तुझ्या नवऱ्याचं…’; विवाहितेचा सतत छळ, त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापूर हळहळलं
कष्टाळू तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांना मोठा धक्का
ओंकार बरगे हा शेळेवाडी गावातील कष्टाळू, मनमिळाऊ तरुण म्हणून ओळखला जात होता. बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर त्याच्याकडे होता. गावातील यात्रोत्सवात शंभर किलोची गुंडी उचलून दोन-तीन फेऱ्या मारण्याचा त्याचा क्रीडा दाखवण्याचा उत्साह गावकऱ्यांच्या आठवणीत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. तर अल्पवयीन मुलगी अकरावीला शिकत होती. प्रेमप्रकरणातून नैराश्य येऊन त्यांनी हा कटु निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे शेळेवाडी आणि तरसंबळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
kolhapur News : पुण्यात मुलाखतीसाठी निघाला, वाटेत भीषण अपघात, फुफ्फुसाच्या श्वासनलिका तुटल्या, पण… देशातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया
तालुक्यात अशा प्रकारची तिसरी घटना
राधानगरी तालुक्यात ही तिसरी अशी प्रेमप्रकरणाशी निगडित आत्महत्येची घटना आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी आमजाई-व्हरवडे येथील कात्यायनी कळंबा जंगलात दोघांनी आत्महत्या केली होती, ज्याची संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा झाली. त्यानंतर तुरंबे-तळाशी येथे दुसरी घटना घडली. आता तरसंबळे-चोरवाडी परिसरात ही तिसरी घटना घडल्याने तालुक्यातील तरुणांसाठी इशारा म्हणून पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांनी प्रेमप्रकरणे आणि कट्टरवाद टाळण्याबाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल जठार करीत असून, पुढील माहिती समोर येताच कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले.
