Solapur Crime News : मुंबईतील पवई येथे राहणारे व्यावसायिक विमलकुमार गोयंका यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी कोल्हापूर आणि पन्हाळा येथे मध्यरात्री धाड टाकून दोघांना अटक केली. प्रकरण कसं समोर आलं जाणून घ्या.
फसवणुकीचं जाळं कसं विणलं?
आंतरराष्ट्रीय टोळीने व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे विमलकुमार गोयंका यांच्याशी संपर्क साधला होता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट किंवा तिप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना बनावट ट्रेडिंग ॲपवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला ॲपवर मोठ्या रकमांचे जमा दिसवून विश्वास बसवला. गोयंका यांनी 3 लाख रुपये काढून घेऊन खात्री केली; पण नंतर अकाउंट ब्लॉक झाले आणि कर भरण्याच्या भीतीने आणखी पैसे मागितले. एकूण 1 कोटी 10 लाखांचा भरणा झाल्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडला. फसवणूक समजताच गोयंका यांनी मुंबई वेस्ट सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
Prakash Ambedkar: ‘महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागलाय!’; प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात, दोन्ही पवारांवरही डागली तोफ
40 खात्यांवर रक्कम वाटली
तपासात असे उघड झाले की, फसवणुकीची रक्कम मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या 40 बँक खात्यांवर विभागली गेली. यात पन्हाळा येथील दस्तगीर काझी यांच्या खात्यात 7 लाख रुपये जमा झाल्याचे निदर्शनास आले. काझी हे व्यवसायाने आइस्क्रीम विक्रेते आहेत, तर चेतन पाडळकर हे बँकिंग एजंट म्हणून खाती उघडून देत होते. पाडळकरने काझी यांच्यासह इतरांना खाती पुरवली, ज्यातून फसवणुकीची रक्कम वाहली गेल्याचा संशय आहे. चौकशीत काझींचे भाऊ इस्माईल यांना ताब्यात घेतले; पण त्यांची सुटका करण्यात आली.
Solapur Crime: मुलांसोबत अखेरचा सेल्फी काढला अन् पोलिसाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; सोलापुरात खळबळ
मध्यरात्रीची वेगळी कारवाई
मुंबई वेस्ट सायबर पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन गच्चे, विजय घोरपडे, संग्राम जाधव यांच्या पथकाने स्थानिक शाहूपुरी आणि पन्हाळा पोलिसांच्या मदतीने बुधवारी मध्यरात्री छापे टाकले. पन्हाळ्यातील मुसलमान गल्लीतील काझी यांच्या घरी आणि बापट कॅम्प येथील संत गोरोबा कुंभार वसाहतीतील पाडळकरांच्या घरी एकाच वेळी कारवाई झाली. व्यवसायाने अभियंता असलेल्या पाडळकरच्या अटकेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दोघांनाही शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेवून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि सकाळी मुंबईकडे रवाना झाले.
‘हॅलो! पप्पांना खल्लास केलं’, मनोजने भावाला फोन लावत सांगितलं, सोलापुरातलं चक्रावणारं प्रकरण
दरम्यान, टोळीचे धागेदोरे कंबोडिया आणि म्यानमारपर्यंत असून आणखी संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सर्वसामान्यांची खाती फसवणुकीसाठी वापरू नका, असा इशारा दिला आहे. हा तपास सुरू असून, इतर पीडितांची माहिती समोर येऊ शकते.
