Maharashtra Mumbai Weather Update Today : मुंबईत अंशत: ढगाळ वातावरण, तर राज्यातील काही भागात तुरळक पावासाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईत आकाश निरभ्र आणि अंशतः ढगाळ
मुंबईत सकाळी, पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवेल, तर दुपारनंतर तापामानात काहीशी वाढ होईल. मुंबईत दिवसाचं तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान असेल, तर रात्रीचं किमान तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. मुंबईत आकाश निभ्रर आणि अंशत: ढगाळ असेल. मुंबईत काही प्रमाणात धुक्याचंही प्रमाणही पाहायला मिळेल. मुंबईत सध्या हवामान कोरडं राहील. मुंबईत थंडीची लाट नसली, तरी हवामानातील गारवा अद्यापही कायम राहणार आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather : कोकणात पुन्हा थंडीचा कडाका, दापोलीत पारा 7.4 अंशांवर; मुंबईसह विदर्भ-मराठवाड्यातही गारठा
राज्यातील काही भागात पावसाची शक्यता
दरम्यान, मुंबईत हवामान खात्याने पावासाची शक्यता नसल्याचं सांगितलं असलं, तरी राज्यातील इतर भागांमध्ये हवामानाची स्थिती काहीशी वेगळी आहे. IMD कडून राज्यातील हवामानात बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. राज्यातील काही भागात पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात 12 ते 13 जानेवारी या काळात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात पावसाची शक्यता, हवामान विभागाचं निशाणा, काय घ्यावी काळजी?
अतिशय अल्पकालीन अधूनमधून पडणारा पाऊस
कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हवामान ढगाळ नसेल, मात्र अतिशय तुरळक पावासाचा अंदाज आहे. कोकणातही थंडीचा कडाका वाढला आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतील पारा 7.3 अंशांवर आला आहे. दापोलीतील या तापमानाची नवीन वर्षातील सगळ्यात कमी तापमान म्हणून नोंद करण्यात आली आहे. राज्यात वर्तवण्यात आलेला हा पावसाचा अंदाज अतिशय अल्पकालीन आणि तुरळक, अधूनमधून पडणारा असून त्याचा मोठा परिमाण दिसणार नसल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
