नात्यातील ताण, संशय आणि शिवीगाळ… आणि अखेर तरुणाचा निर्घृण अंत. घटनेनंतरचा थरारक पाठलाग आणि पोलिसांची कारवाई
अमोल एकनाथ बारे (वय ३० अस मयताच नाव आहे तर युवराज राठोड, प्रमोद वाघचौरे, शुभम राठोड आणि एक अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,मयत अमोलला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्याला घटस्फोट हवा होता. अमोलची पत्नी आणि मुख्य आरोपी युवराज राठोड याची पत्नी या चुलत बहिणी आहेत. आपल्या पत्नीला घटस्फोटासाठी राजी करावे, यासाठी अमोल हा युवराज आणि त्याच्या पत्नीकडे सतत तगादा लावत होता. या वादातून ४ जानेवारी रोजी रात्री अमोलने युवराजला फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली होती.
Buldhana Crime : रिक्षाचालकाला क्रूरपणे संपवलं, बॉडी रस्त्याच्या कडेला, CCTV अन् शेवटच्या लोकेशनवर होणार घटनेचा उलगडा?
असा काढला काटा
अमोलच्या त्रासाला वैतागलेल्या युवराजने त्याचे साथीदार प्रमोद वाघचौरे आणि शुभम राठोड यांना मदतीला बोलावले. त्यांनी अमोलला दुचाकीवर बसवून ओॲसिस चौक परिसरात नेले. तिथे त्याला जबर मारहाण करण्यात आली आणि प्रमोदने चाकूने अमोलच्या छातीवर, गळ्यावर व पाठीवर सपासप वार केले, ज्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला.
१८०० किमीचा पाठलाग करून बेड्या
खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सतत आपली ठिकाणे बदलली. ते नवीन सिमकार्डचा वापर करून लोकेशन लपवत होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अहिल्यानगर, नाशिक, जालना व छत्रपती संभाजीनगरसह तब्बल १४ जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली.
अखेर १८०० किमीचा पाठलाग करून पोलिसांनी जालना बसस्थानक परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.
