Ahilyanagar Youth Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपींचा पहिला गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सचिन कल्याणराव गिधे (रा. हॉलीडे पार्क शेजारी शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हा साई सुनिता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता. त्यादरम्यान फिर्यादी श्रध्दा गिधे यांना आरोपी प्रविण वाघमारे याने फोन करुन ‘सचिन लई माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील’, अशी धमकी दिली. सचिन गिधे हा परत घरी न आल्याने फिर्यादी श्रध्दा सचिन गिधे यांनी दि. 15 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाणे गु.र.नं. 454/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे आरोपी प्रविण उर्फ पचास वाघमारे, दिपक अंबादास पोकळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Pune Crime : ‘बॉयफ्रेण्डचं घरभाडं थकलं, गर्लफ्रेंडचा भयानक प्लॅन, घराचा दरवाजा उघडा ठेवला अन्…; पुण्यात खळबळ
आरोपींचा दुसरा गुन्हा
दि.10 डिसेंबर 2025 रोजी गौतम कैलास निकाळे (वय 25, रा. राहाता, ता. राहाता, हल्ली रा. सौंदडीबाब चौक) याला आरोपी प्रविण वाघमारे व त्याचा साथीदारांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला साकुरी शिव याठिकाणी जाऊन येवू असं म्हणून मोटारसायकलवर बसवलं. त्यानंतर उपासणे बाबा मंदीराच्या पाठीमागे या ठिकाणी नेत त्याला आरोपी प्रविण वाघमारे व त्याच्या इतर साथीदारांनी लाथा बुक्क्या व दगडाने मारहाण करुन पाय फ्रॅक्चर केला. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 1027/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (2), 118(1), 115(2), 352, 351 (2), 3(5) प्रमाणे दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल आहे.
Pune Crime : इन्स्टाग्रामवर मुलीशी ओळख, तिच्या मदतीने अमनला बोलावलं, ‘दृश्यम’प्रमाणे मोबाईल ट्रकमध्ये फेकला; पुण्यातील ‘त्या’ हत्येचं सत्य समोरआरोपी प्रविण वाघमारे याने व त्याच्या साथीदारांनी एकाच दिवशी दोन गुन्हे केलेले असून अपहरित इसमाचा शोध लागलेला नसल्यानं एसपी सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपींचा तसेच अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते. सदर आदेशानुसार सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सुनिल मालणकर, सतिष भवर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड, भगवान धुळे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आरोपीची माहिती काढणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन रवाना करण्यात आले होते अखेर या पथकाने संगमनेर तालुक्यातून आरोपींना जेरबंद केले.
