• Sun. Mar 15th, 2026

    राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा  निकाल जाहीर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 6, 2026
    राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा  निकाल जाहीर – महासंवाद

    मुंबई,दि. ६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

    १७ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडतीमधून G-16/9702 या प्रिन्स लॉटरी, कल्याण यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रु.२७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.

    १९ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष या मासिक सोडतीमधून GS-03/3405 या ओम गं गणपतेय नमः लॉटरी, पुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रु.२१ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.

    तसेच महाराष्ट्र सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रू. ७ लाखांची प्रथम क्रमांकाची एकूण ७ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

    याशिवाय डिसेंबर-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १०१२४ तिकीटांना रू. ७७,५१,१००/- व साप्ताहिक सोडतीतून ५९,६३२ तिकीटांना रू. १,८१,४४,६००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

    सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रू. १०,०००/- वरील बक्षिसांची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी.  १०,००० रुपयाच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे प्रसिद्धीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

    ००००

    वंदना थोरात/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed