अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम आज प्रचंड गाजला. कारण या संमेलनाचा एकीकडे समारोपाचा कार्यक्रम सुरु होता तर दुसरीकडे सीमा भागातील नागरिकांनी घोषणाबाजी करत आपलं लक्ष वेधून घेतलं.
घोषणाबाजीने मंडपाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ
दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन सीमाभाग महाराष्ट्रात घेण्याची मागणी मराठी बांधव करतात. साताऱ्यातील संमेलनातही सीमावासियांनी धडक दिली. ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशी घोषणाबाजी करतच सीमा भागातील बांधव संमेलनाच्या प्रवेशद्वारावर आले. त्यामुळे समारोपाच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखून धरले. आम्ही प्रत्येक संमेलनात जाऊन संयुक्त महाराष्ट्राची मागणी करतो. आम्हाला आत जाऊ द्या, अशी विनंती सीमाबांधव करत होते. पण पोलिसांनी त्यांना मंडपात सोडले नाही. त्यामुळे सीमावासियांनी घोषणाबाजी केली.
दारी सीमा भाग जमला, भीक वाढा हो मराठी…
सीमावासियांच्या हातातील बॅनर सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असं लिहिलेल्या टोप्या मराठा बांधवांनी डोक्यात घातल्या होत्या. सीमावासीय आपल्या मागण्या पोटतिडकीने मांडत होते. पोलिसांनी मंडपात जाऊ न दिल्याने मराठा बांधवांनी पत्रके भिरकावली. ‘दारी सीमा भाग जमला, भीक वाढा हो मराठी, दडपशाही सहन करूनी, बोलतो मराठी!’ अशा शिर्षकाची पत्रके नागरीकांनी गोळा करून वाचली. अत्यंत पोटतिडकीने सीमा बांधवांनी आपल्या वेदना त्यात मांडल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ घोंघावणार? Nilesh Lanke यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
तोच खरा महाराष्ट्र
महाराष्ट्रातील नेत्यांची बेळगावला यायची आता काय बिशाद आहे. आता उरले आहे ते केवळ शड्डू ठोकणारे दिखाऊ पैलवान. शिवरायांचे नाव घेता, टिळकांचा बाणा सांगता. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल, अशी शेखी मिरवता. ‘दिल्लीचेही तख्त फोडतो महाराष्ट्र माझा, बोलतो मराठी, चालतो मराठी’, ही गाणी बंद करा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून गुलाल उधळून नाचणाऱ्यांनो, ‘आमच्या उरावर उभे राहून हे कन्नडीग आमच्या भाषेला धुडकावत आहेत. ज्या दिवशी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदल, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होईल, तोच खरा महाराष्ट्र!’, अशा खरमरीत पत्रकाच्या माध्यमातून सीमा बांधवांनी महाराष्ट्रातील नेते आणि साहित्यिकांना सुनावलं आहे.
महाराष्ट्राच्या उभारणीत सीमाभागाचा वाटा
मराठीला आम्ही नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर दिले. कवीवर्य कृ. ब. निकुंब, कवियत्री इंदिरा संत, शंकर रामाणी, अशी कवींची मांदियाळी अर्पण केली. कारगिल युद्धात सिंहाचा वाटा उचलणारी मराठा लाईन एन्फन्ट्री बेळगावचीच. बाबा पदमजी हा पहिला मराठी कादंबरीकार बेळगावचाच. महाराष्ट्राच्या उभारणीत सीमा भागाचा आणि विशेषतः बेळगावचा वाटा मोलाचा असल्याचं सांगण्याचा प्रयत्न सीमा बांधवांनी केला आहे.
BMC Election : घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, 100 युनीटपर्यंत वीज मोफत, तर 10 रुपयांत जेवण, ठाकरे बंधूंचा वचननामा
सीमा बांधव हाक देती, ऐक बा मराठी!
दडपशाही न भीता आम्ही बोलतो मराठी, घेत लाठी पाठीवरती चालतो मराठी, कानडीच्या बंधनाला ठोकतो मराठी, हाती भगवा घट्ट धरला फडकतो मराठी, येऊ दे तुफान वादळ आम्ही ठाकतो मराठी, जिंकण्यासाठीच आम्ही जन्मलो मराठी, सीमा बांधव हाक देती ऐक बा मराठी, साद दे महाराष्ट्र राज्या मागणे मराठी, अशा काव्य पक्तींतून सीमा बांधवांनी मोठ्या आशेने महाराष्ट्राला साद घातली आहे.
