Akshay Waghmare Love Story : अभिनेते अक्षय वाघमारे यांनी ‘दगडी चाळी’तील डॅडीच्या मुलीसोबत सूत कसं जुळलं, हा किस्साही सांगितला.
कसे जुळले अक्षय-योगिता यांचे प्रेमसंबंध?
दगडी चाळीबाबत एक दरारा आहे. तुम्ही अरुण गवळीच्या मुलीला प्रेमात पाडण्याचं डेअरिंग कसं काय केलंत? असा प्रश्न अक्षय वाघमारे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “थोडा अवघड प्रश्न आहे.. योगिताचे कझिन्स माझे मित्र होते. गाठभेट झाली आणि एकमेकांचे स्वभाव आवडले. मी २०१८ मध्ये ती फुलराणी नावाची एक मालिका करत होतो. त्यावेळी ती एमआयटीमध्ये शिक्षण घेत होती. तेव्हा ओळख वाढली आणि बाँडिंग वाढत गेलं. मग घरच्यांचा पाठिंबा आणि आशिर्वादाने लग्न केलं.” याला जोड देताना योगिता गवळी म्हणाल्या, की “फ्रेण्डशिप झोनमध्ये सगळं घडत गेलं. क्लिक व्हावं लागतं, ते झालं. एकमेकांमोबत कम्फर्ट होता”
घरुन विरोध होता का?
अरुण गवळीच्या मुलीशी लग्न करायला विरोध झाला का, असं विचारलं असता, अक्षय वाघमारे यांनी सांगितलं, की घरुन थोडा विरोध होता. पण जेव्हा दोन्ही कुटुंबं भेटली, तेव्हा माझ्या आई वडिलांना समजलं की मम्मी डॅडी इतके साधे आहेत. दोन्ही घरचे म्हणाले की संसार तुम्हाला करायचा आहे, त्यामुळे तुम्ही ठरवा, आम्ही काय यामध्ये पडणार नाही, असं अक्षय वाघमारे यांनी सांगितलं.
