Chhatrapati Sambhajinagar News : शहरात भाजपमुळे युती तुटल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने केली आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत आता मैत्रीपूर्ण नाही, तर थेट लढत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
स्थानिक पातळीवर भाजपचा ‘कट’
संजय शिरसाट यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप करताना म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी युती टिकवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र स्थानिक पातळीवर भाजपने ‘कट’ रचला. बैठकांमध्ये एक बोलायचे आणि प्रत्यक्षात शिवसेनेच्या जागा कापायच्या, ही भाजपची रणनीती असल्याचा दावा त्यांनी केला. ‘आमची ताकद वाढली म्हणून आम्ही काहीही करू शकतो, या भाजपच्या गैरसमजातूनच हा अहंकार निर्माण झाला आहे,’ असेही ते म्हणाले.
Municipal Election : एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे महायुतीमधील जागांच्या तिढ्याबाबत मोठे विधान, म्हणाले आम्हाला युती…
संभाजीनगरमध्ये युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या, स्थानिक कार्यकर्ते वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले, आधीच शंका आली होती, मी दरवेळी स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या, बावनकुळे यांच्याबरोबर देखील बैठक झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर जागा वाटप ठरलं. त्यावेळी युती झाली या संभ्रमात होतो. मात्र ज्यावेळी जागा द्यायची तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव दिला. दुसरीकडे युतीच्या चर्चा होत्या. या घडीला सुद्धा कोणताही नवीन प्रस्ताव दिला नाही, आग्रही भूमिकेला तडा दिला, अशा भाषेत शिरसाट यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजपचा शिवसेनेच्या जागांवर दावा, संजय शिरसाट संतप्त, महापालिका निवडणुकीपूर्वी मिठाचा खडा
‘स्थानिक नेत्यांना आवरा, अन्यथा उघड बोलेन’
निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अंधारात मुलाखती घेऊन गोंधळ निर्माण केल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. ‘कुठे कट शिजला, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. मला तोंड उघडायला लावू नका, स्थानिक नेत्यांना आवरा,’ असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.
