Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पुरुष जातीचं मृत अर्भक नदीत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट
अक्कलकुवा शहराजवळ असलेला सोरापाडा गावाच्या शिवारात असलेल्या वरखेडी नदीच्या कोरड्या पात्रात 27 डिसेंबर शनिवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलीस पाटील शरद वळवी यांना सुमारे सहा ते सात महिने वयाचे पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आलं. या अज्ञात अर्भकाच्या आई-वडिलांनी अर्भकाच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यासाठी नदीपात्रात फेकून अर्भकाच्या जन्माची लपवणूक करण्यासाठी फेकून दिल्याचं आढळून आलं. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. त्याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस पाटील शरद भरत वळवी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मयत अर्भकाचे अज्ञात आई-वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 94,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार नूर पिजारी करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह पाहणी केली.
Buldhana News : अचानक शेतातील गोठ्यातून जीवांच्या आकांताने ओरडण्याचा आवाज, बुलढाण्यात काय घडलं?
जावयाचा भयानक कट
नंदुरबारमधील एका दुर्गम भागातील गावात घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गाव दिवाळी पाहण्यासाठी गेलेली एक 45 वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर एका पडीत घरात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनेचा तपास करताच एक धक्कादायक कट समोर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Virar Crime : लग्नाच्या वर्षभरातच छळ, पत्नीचा घर सोडण्याचा निर्णय; तेवढ्यात….विवाहितेला पती-नणंदेने संपवलं, विरारमध्ये खळबळ
नेमकं काय घडलं?
गावात गाव दिवाळी असल्याने 45 वर्षीय महिला रात्री घराबाहेर पडली. मात्र, ती घरी न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेत असताना एका पडीत घरात रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. मयत महिलेच्या जवळच्या नातेवाईकाने मित्राच्या साथीने महिलेचे डोके सिमेंटच्या पोल वर आदळून व विटेने डोक्यात मारून खून केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
