BMC Election : संदीप राऊत यांनी विजयाचा गुलाल उधळल्यास एकाच कुटुंबातील तिन्ही भाऊ लोकप्रतिनिधी झाल्याचं चित्र पाहायला मिळेल.
ठाकरे बंधूंची युती
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या बीएमसी निवडणूक लढणार आहेत. दोन्ही पक्षांचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसलं, तरी चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.
कुठून निवडणूक लढण्यास उत्सुक?
अशातच मुंबईच्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १११ भांडूप पूर्वमधून संदीप राऊत महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या वॉर्डसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही आग्रही आहे. आता संदीप राऊतही तिथूनच निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
Pune News : प्रशांत जगतापांची सोडचिठ्ठी, पवारांच्या NCP चे नवे पुणे शहराध्यक्ष कोण? दोघांची नावं चर्चेत, एकाचा नकार
ठाकरे-पवार गटात रस्सीखेच
विक्रोळी-भांडुप परिसरातील १११ नंबरच्या वॉर्डवरुन ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ तेथून लढण्यास इच्छुक आहेत. परंतु आता संदीप राऊत यांनी सोशल मीडियावर याच वॉर्डमधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे जाहीर करत धक्का दिला आहे.
Ajit Pawar : कोणी मागे येऊ नका, अजितदादा बारामती हॉस्टेलमधून एकटेच निघाले, आता गाडी कुठे आढळली?
एकाच कुटुंबात होतील तीन लोकप्रतिनिधी
दरम्यान, संदीप राऊत मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले, तर अनोखे चित्र पाहायला मिळेल. एकाच कुटुंबातील तिन्ही भाऊ लोकप्रतिनिधी झाल्याचे उदाहरण समोर येईल. संजय राऊत हे संसदेत वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेत खासदार आहेत. दुसरे बंधू सुनील राऊत हे विधिमंडळाचे सदस्य आहेत. सुनील राऊत विक्रोळीतून आमदार आहेत. आता तिसरे बंधू हे मुंबई महापालिकेत नगरसेवकपद भूषवण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे तीन वेगवेगळ्या सदनांमध्ये राऊत कुटुंबातील बंधू जनतेचं प्रतिनिधित्व करताना दिसतील.
तुटलेली वाट ते पुन्हा एकत्र प्रवास; ठाकरे बंधूंचं राजकीय पुनर्मिलन मुंबईला दिशा देणारं ठरेल?
