• Sun. Sep 6th, 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची उद्यापासून मुलाखत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 24, 2025
‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची उद्यापासून मुलाखत – महासंवाद

मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षा’ या महत्त्वाच्या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तथापि, सायबर फसवणूक, ऑनलाईन गुन्हे, बनावट संदेश, आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा प्रकारच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा कसा जबाबदारीने वापर करावा, कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये, यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत पोलीस उप आयुक्त कराड यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

निवेदक सुषमा जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत दि. २५, २६, २७, २९ आणि ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News on AIR’ (न्यूज ऑन एआयआर) या मोबाईल अॅपवर देखील ही मुलाखत ऐकता येईल.

०००

जयश्री कोल्हे/स.सं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed