Pune-Mumbai Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या दरीपुलावर केबल बसवण्याचे काम 93 टक्के पूर्ण झाले असून, लवकरच हा मार्ग वाहतूकीसाठी खुला होणार आहे. डेडलाईन पाहा…
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्याचा आदेश दिला होता. पुणे-मुंबईदृतगती महामार्ग क्षमतावाढीचा हा प्रकल्प आहे. या वर्षी मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू होता. दरीपुलाचे काम करणे आव्हानात्मक होते. ऑक्टोबरमध्ये पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर उर्वरित कामाला गती मिळाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या टीमने गुरुवारी (18 डिसेंबर) मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली.
Pune-Satara Highway: पुणे-सातारा महामार्गाचा कायापालट, हलक्या वाहनांना मिळणार पर्यायी मार्ग; नेमकं काय बदललं?
वैशिट्ये काय?
सद्यस्थितीतद्रुतगती महामार्गावर खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) यादरम्यान १९ किलोमीटर इतके अंतर आहे. प्रकल्पाच्या कामास २०१९ पासून सुरुवात झाली आहे. पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावरील घाटांतील १३.३ किलोमीटर अंतर कमी करण्यासाठी १.६८ किलोमीटर आणि ८.८७ किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत; तसेच देशातील सर्वाधिक सुमारे १८१ मीटर उंचीचा दरीपूल उभारला आहे. त्या पुलाचा एक भाग तयार झाला असून, उर्वरित पुलाचा दुसरा मार्ग एकमेकांना जोडण्याचे; तसेच केबल लावण्याचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
एकूण २४० केबलपैकी सुमारे दीडशे केबल बसविल्या आहेत. केबल बसविणे; तसेच अन्य कामे पूर्ण करण्यासाठी नवे वर्ष उजाडणार आहे. मार्च २०२६पर्यंत काम पूर्ण होऊन हा पूल मे महिन्यात खुला होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. २०१९मध्ये प्रकल्पाचा खर्च सहा हजार ९०० कोटी रुपयांचा होता. पावसामुळे आणि इतर कारणांमुळे प्रकल्पाचा खर्च वाढला असून, तो साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
अजितदादांकडून निवडणूक लढले, विजयानंतर शरद पवारांची भेट, सचिन सातव काय म्हणाले?
अलार्म यंत्रणेद्वारे मिळणार मदत
पुण्याहून मुंबईकडे जाताना किंवा मुंबईहून पुण्यात येताना प्रवासादरम्यान काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या वेळी मदतीसाठी बोगद्यात अलार्म यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्या यंत्रणेवरील बटण दाबल्यास त्याद्वारे नियंत्रण कक्षाला मदतीची गरज असल्याचा इशारा सेन्सॉरद्वारे मिळू शकणार आहे. त्याशिवाय नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठीही त्या भागात यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याशिवाय बोगद्यांमधून दर ३०० मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे किंवा मुंबईहून पुण्याकडे जायचे नसल्यास पुन्हा परतीचा प्रवास करणे सोपे होणार आहे.
