Pune News : आतापर्यंत पुण्यातील १० लाख वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी आठ लाखांजवळ वाहनांना नंबरप्लेट बसवली
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले होते. त्यानुसार जानेवारी २०२५ पासून ही नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अपघात किंवा गुन्ह्यातील सहभागी होणारी वाहने सहज पकडता यावीत, प्रत्येकाचे वाहन सुरक्षित राहावे; म्हणून सर्व वाहनांना सुरक्षा नंबरप्लेटचे बंधन घालण्यात येत आहे. अनेक गुन्हे व अपघातांमधील वाहने या नंबरप्लेटमुळे सहज शोधता येणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.
आतापर्यंत पुण्यातील १० लाख वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी आठ लाखांजवळ वाहनांना नंबरप्लेट बसवली आहे. पुण्यात साधारण २६ लाखांच्या पुढे वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे; पण अद्याप १० लाख वाहनांनी नोंदणी केल्याचे दिसले. म्हणजेच पुण्यातच १६ लाख वाहनांना अद्याप सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. परिवहन विभागाकडून पाच वेळा मुदतवाढ दिली गेली आहे.
Condom Spree : ना शंभर-दोनशे, ना हजाराच्या घरात… तरुणाचा वर्षभर सपाटा, एक लाखाचे कंडोम खरेदी, पोलखोल कुणामुळे?
मध्यंतरी ‘फिटमेंट सेंटर’ कमी असल्याची ओरड होत होती; परंतु ‘आरटीओ’च्या सूचनेनुसार, काही प्रमाणात ‘फिटमेंट सेंटर’ वाढवूनही नंबरप्लेट बसवण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. उरलेल्या वाहनधारकांसाठी पुन्हा मुदतवाढ द्यावीच लागेल. अद्याप ६५ टक्के वाहनांना नंबरप्लेट बसविलेली नाही.
Couple Dead : बाथरुममध्ये जोडप्याच्या नग्न बॉडी सापडल्या, आंघोळ करतानाच श्वास सोडला, ४० वर्षीय रेणूचा हात…
डिसेंबर महिन्यात ५० हजार वाहनचालकांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केली. हा वेग राहिल्यास पुढील काही महिने सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यासाठी लागतील. त्यामुळे परिवहन विभाग आणखी मुदतवाढ देते, की थेट कारवाई सुरू करते हे पाहावे लागेल.
