बीड जिल्ह्यातील खुंटेफळ येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण….
डॉक्टरांनी तपासून मृत घोषित
रुग्णालयातील डॉक्टरांनी पूजाची तपासणी केली असता, तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला. यावेळी अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार भगवान देवकर यांनी घटनेचा पंचनामा पूर्ण केला. शवविच्छेदन रविवारी सकाळी करण्यात आले. यानंतर शोकाकुल आणि गंभीर वातावरणात पूजावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
SC-ST आरक्षणात क्रिमी लेयरचा वाद; वंचितचा भूषण गवईंवर मनुवादी विचारधारेचा ठपका
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
या घटनेमुळे खुंटेफळ गावात शोककळा पसरली आहे. पूजा ही अल्पवयीन होती आणि तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याचा पुढील तपास अंभोरा पोलीस हे करत आहेत
शॉर्टसर्किटमुळे घरगुती साहित्य जळून खाक
बीड तालुक्यातील बाभळवाडी येथील रहिवासी महेश गोकूळ फिरंगे यांच्या घरात अचानक शॉर्टसर्किट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत घरातील कापूस, सर्व कपडे, दागिने तसेच धान्य आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे.
आधीच घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या आगीमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. घरातील दैनंदिन वापराच्या वस्तूंसह साठवलेले धान्य आणि मौल्यवान दागिने जळून नष्ट झाल्याने कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
