Sindhudurg Minor Girl Commits Suicide : सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गोव्यामध्ये आपलं आयुष्य संपवलं आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दि. 5 डिसेंबर रात्री मयुरीआपल्या कुटुंबियांसोबत बांदा येथे श्रीबांदेश्वर जत्रेसाठी आली होती. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ती वडिलांसोबत घरी परतली. त्यानंतर जेवण करून सर्वजण झोपी गेले. काल शनिवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास तिचे वडील खोलीत गेले असता ती ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिला तात्काळ कासारवर्णे (गोवा) येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं.
Akola Crime : शाळेत मुलाकडून सतत छेडछाड, 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचं धक्कादायक पाऊल; वडिलांचा गंभीर आरोप
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, टी. टी. कोळेकर, संगीता बुर्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी शवविच्छेदन केलं. मृत तरुणी ही पेडणे गोवा येथे बारावीत शिकत होती. तिच्या मागे आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. बांदा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
