Daund Police Naik Nikhil Ranadive Missing : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे काही दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली शिक्रापूर येथे झाली होती; मात्र, यवत ठाण्यातून त्यांना रिलीव्ह करण्यात विलंब झाल्याने ते तणावात असल्याची माहिती सहकाऱ्यांकडून मिळत आहे. रणदिवे यांच्या कुटुंबीयांनीही अलीकडेच शिक्रापूरला स्थलांतर केलं होतं. रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अनेक ठिकाणी वारंवार दूरस्थ ठिकाणी कर्तव्य नेमल्यामुळे त्यांच्या आजारी मुलीकडे पाहता आलं नाही, अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुखांकडून त्रास होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
आधी दिपाली लॉजमध्ये गेली, नंतर नगरसेवक संदीपही रूममध्ये घुसला; CCTV मध्ये काय दिसलं? पोलिसांनी सांगितलं…
देशमुखांविरुद्ध आधीचेही आरोप चर्चेत
यवत ठाण्यात कार्यरत काही कर्मचाऱ्यांमध्ये देशमुख यांच्या कारभाराबद्दल नाराजी असल्याच्या चर्चा आधीपासूनच होत असून, काही काळापूर्वी एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्यानेही त्यांच्यावर सोशल मीडियावरून आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्यावर सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला करण्याची मागणी काही कर्मचारी गटांतून दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.
शिकार समजून गोळी झाडली, मित्राच्या छातीत घुसली; ‘आई गं…’; किंचाळी ऐकू येताच मित्र धावला; एकुलत्या एक सचिनचा करुण अंत
देशमुखांनी आरोप फेटाळले
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. निखिल रणदिवे हे बेपत्ता असल्यामुळे जिल्हा पोलीस दलात चिंता व्यक्त होत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तातडीची पावले उचलण्यात येत असून अधिकृत तपास सुरू आहे.
