Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. 8 ते 9 डिसेंबर दरम्यान शहराच्या 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15 टक्के पाणी कपात केली जाईल.
पाणी कपातीचे कारण म्हणजे तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी 2750 मिमी व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम. हे दुरुस्तीचं काम अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे महापालिकेला पाणी कपात अपरिहार्य ठरली आहे. याच कारणासाठी 3-4 डिसेंबरदरम्यान पाणी कपात जाहीर केली होती; मात्र महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून ती कपात रद्द करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता परंतू आता परत त्यांना पाणी कपातीच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात पाणी कपात रद्द; 14 विभागांवर परिणाम, ‘या’ कारणामुळे BMCचा मोठा निर्णय
मात्र आता ही कपात दोन दिवसांनी पुढे ढकलून 8-9 डिसेंबर रोजी लागू करण्यात येत आहे. त्यात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, आधी 14 विभागांत होणारी ही कपात आता 17 प्रशासकिय विभागांमध्ये लागू राहणार आहे. यामुळे शहरापासून उपनगरांपर्यंत लाखो नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या काही काळापासून, नागरिकांचे आधीच पाण्यामुळे हाल होत आहेतय त्यात आता आणखी पाणी कपात केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
कोणत्या विभागांमध्ये पाणी कपात?
शहर विभाग : ए, सी, डी, दक्षिण-जी, उत्तर-जी
पश्चिम उपनगर : एच-पूर्व, एच-पश्चिम, के-पूर्व, के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-उत्तर, आर-मध्य
पूर्व उपनगर : एन, एल आणि एस विभाग
निवडणुकीत पैसेवाटप, निवडणूक आयोग ते विरोधी पक्षनेते पद; भास्कर जाधव प्रचंड संतप्त
महापालिकेने नागरिकांना 8 डिसेंबरच्या आधी पाणी साठवून ठेवण्याचा आणि पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दुरुस्तीची कामे सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्याची विनंतीही केली आहे.
