Jalna News: जालना शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या १८ वर्षांच्या साथीदाराने पोस्टाने धारदार तलवारी मागवल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना…
पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली की, पोस्टाने मागवलेली तलवार घेण्यासाठी एक तरुण मोटारसायकलवरून पोस्ट ऑफिसमध्ये येणार आहे. ही माहिती मिळताच, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पोस्ट ऑफिस परिसरात सापळा रचला. दोन तास वाट पाहिल्यानंतर, दुपारी चारच्या सुमारास एक तरुण आणि एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून आले. ते पोस्टातून खाकी रंगाचा बॉक्स घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले.
Kolhapur Crime: बिस्कीट- गोळ्यांचं आमिष, अल्पवयीन मुलीचा महिनोंमहिने पाठलाग; नराधम वृद्धाचा संतापजनक प्रकार, महिलांनी चोपला तर पोलिसांनी…
त्यांची नावे विचारली असता, १८ वर्षीय रेहान शेख सलीम याने त्याचे नाव सांगितले आणि बॉक्समध्ये तलवार असल्याचे कबूल केले. त्याने घरी आणखी एक तलवार असल्याचेही सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तलवारी जप्त केल्या आणि रेहानला अटक केली. या कारवाईमुळे पोस्ट ऑफिस परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. तरुणांमध्ये वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर, जालना पोलिसांनी अशा भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गावर आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर बाजार डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के, डीवायएसपी पथकाचे पोउपनि. हरिष राठोड, पोहेकॉ. रामप्रसाद रंगे, पोकॉ. परमेश्वर धुमाळ, पोकॉ. सागर खैरे, पोकॉ. दुर्गेश गोफणे, पोकों. विशाल काळे, पोकॉ. इम्रान खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
