Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. असात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या कारच चाक निखळलं असून देखील मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक कार पळवत आहे.
धाडसी युवक सत्यजित सरवदे यांनी गाडीचा पाठलाग करत ती गाडी थांबवली आणि वाहतूक पोलिसांना माहिती देऊन ती गाडी थांबवली अन् लोकांचे जीव वाचवले. नाकाबंदी सुरु असताना हा सर्व प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. सदर व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगरपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत हा मद्यधुंद चालक आपली कार चालवत होता. संबंधित चालकाच्या हातावर पार्टीचा बँड देखील दिसत होता. बंडगार्डन पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना हा सर्व प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. गाडीचा टायर निघालेला असताना देखील चालक कार पळवत होता, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Satara Accident : इलेक्शनमुळे कॉलेजला सुट्टी, कोकणात सहल काढली, प्राचार्यांनीच सातारा अपघातामागील स्टोरी सांगितली, आमचं दुर्लक्ष झालं की…
पुण्यातील कुख्यात गुंड निल्या घायवळला मोठा दणका
पुण्यातील कुख्यात निलेश गायवळ टोळीविरोधात कोथरूड पोलिसांनी पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. घायवळ टोळीचा सक्रिय सदस्य आणि निलेश घायवळचा नंबरकारी असणाऱ्या अजय महादेव सरोदे याला अटक केली असून, त्याच्या घरातून तब्बल 400 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
Pune Crime : आधी मुलाकडे रागानं पाहिलं, नंतर बाईकवरुन उतरताच धारदार हत्यारानं वार; पुण्यात PMP स्टॉपवर अल्पवयीन मुलावर हल्ला
17 सप्टेंबरच्या रात्री कोथरूड परिसरात सलग दोन हल्ल्यात एका तरुणावर गोळीबार आणि दुसऱ्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनांनंतर घायवळ टोळीच्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. या हल्ल्याच्या तपासादरम्यान अजय सरोदे हा देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे निश्चित होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
