लातूरच्या उदगीरमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. असं असताना या नगर परिषदेच्या 3 जागांवर तिढा निर्माण झाला आहे. कारण या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
मागील 25 वर्षांपासून उदगीरचे नगराध्यक्षपद विविध प्रवर्गासाठी राखीव राहिले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. भाजपा, काँग्रेस आणि शिंदेसेना या तीन प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवार उच्च शिक्षित असल्याने नगरपरिषद निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.
उदगीरात भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मंत्री अमित देशमुख यांची सभा झाली. गत विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय बनसोडे यांना उदगीर शहरातून मिळालेले मताधिक्य आणि मागील पालिका निवडणुकीत भाजपचे वाढलेले मताधिक्य हे सर्वाधिक आहे.
‘आम्हाला खडसेंचं चॅलेंज नाही, ते 2019 मध्येच संपले’, शिवसेनेच्या संजना पाटील यांचं वक्तव्य
संजय बनसोडे हे शहरात तळ ठोकून प्रचारात आहेत. प्रभाग क्र. ८ अ, प्रभाग क्र. १५ ब, व प्रभाग क्र. १६ ब मधील उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यामुळे या तीन सदस्यपदांसाठीची होणारी निवडणूक लांबणीवर गेली आहे. या तीन प्रभागांतून १२ जण निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीसाठी सात महिला रिंगणात असल्या तरी खरी लढत भाजपाच्या स्वाती सचिन हुडे, काँग्रेसच्या खादरी अंजुम फातेमा सय्यद अब्दुला, शिंदेसेनेच्या सुनीता अनिल पंचाक्षरी यांच्यात होत आहे.
नाना पटोले यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचे संकेत, बावनकुळे म्हणाले….
न्यायालयीन अपिल दाखल झाल्यामुळे प्रभाग क्र. ८ अ, प्रभाग क्र. १५ ब, प्रभाग क्र. १६ ब मधील तीन सदस्यांसाठीची निवडणूक लांबणीवर गेली आहे. प्रभाग क्र. ८ अ मधून भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम या पक्षाच्या चार महिला रिंगणात होत्या. प्रभाग क्र. १५ ब मधून काँग्रेस आणि भाजपामध्ये दुरंगी लढत होत होती. प्रभाग क्र. १६ ब मधून भाजप, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम व अन्य दोन उमेदवार असल्याने सहाजण आखाड्यात होते. मात्र, या तिन्ही ठिकाणांच्या तीन सदस्यांसाठीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. परंतु, प्रभाग क्र. ८ ब, प्रभाग क्र. १५ अ व प्रभाग क्र. १६ अ मधील सदस्यांसाठीची निवडणूक होणार आहे.
