Maharashtra Politics : बांधकाम मजुरांना सरकारने मच्छरदाणी दिली असल्यामुळे थकून आल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा, असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला.
भडगाव येथील सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या सरकारी सुविधांचा उल्लेख केला. याच संदर्भात, कामगारांना सरकारने दिलेल्या वस्तूंपैकी मच्छरदाणीचा उल्लेख करताना त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. बांधकाम कामगारांना सरकारने मच्छरदाणी दिली आहे. त्यामुळे थकून आल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा, असा सल्ला महाजन यांनी दिला. या वेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
“बांधकाम कामगारांना पेट्या मिळाल्यात. त्या किटमध्ये ग्लोव्ह्ज आहेत, बॅटरी आहे, डबा दिला आहे, मच्छरदाणी पण दिली आहे. कामावरुन थकून भागून घरी गेलात तर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा. डास चावता कामा नये.” असं गिरीश महाजन म्हणाले
अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
अशा योजना ठेकेदारांचे भले करण्यासाठी आणल्या जातात. मात्र तुम्ही देत असलेली मच्छरदाणी लावायची कुठे, मच्छरदाणी लावण्यासाठी गरज नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर पलटवार केला.
Aman Kumar : बाबा, मला तुमच्या मांडीवर घ्या, दुखणं असह्य झालंय… 15 वर्षांच्या लेकराने तडफडून प्राण सोडले, पिता हतबल
‘स्टार’ प्रचारकांचे इगतपुरीवर लक्ष
दरम्यान, बदलती राजकीय स्थिती व महायुतीतच मतभिन्नता यामुळे नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ‘स्टार’ प्रचारकांनी इगतपुरीवर लक्ष केंद्रीत केल्याने चुरस निर्माण झाली आहे.
यापूर्वीही इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या; मात्र त्यावेळी आजच्या स्थिती नव्हती. यावेळी बदलते राजकारण, स्थानिक नेत्यांच्या पक्षबदलाची भूमिका, बदलते आरक्षण आदी घटकांमुळे यावेळची निवडणूक रंगतदार होत आहे. सुरुवातीपासूनच इच्छुक उमेदवारांनी प्रभागनिहाय जनसंपर्क करून मोर्चेबांधणी करून ठेवली होती. नगराध्यक्षपद थेट जनतेतून होत असल्याने चुरस वाढली आहे. यावेळी चौरंगी लढत लक्षवेधी ठरत आहे.
Crime News : नाही रे… मला नाही करायचंय आज… लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचा शरीरसंबंधांना नकार, नवरदेवाने तिला जीव जाईपर्यंत…
या मोठ्या नेत्यांची हजेरी
शिवसेना शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुहास कांदे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर आदींनी प्रचारात सहभाग घेतला. तर, भाजपच्या प्रचारासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी रॅली काढली. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या ॲड. सुषमा अंधारे यांनी सभा घेतली.
