Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रो 3 च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मोबाईल ॲपद्वारे विशेष सवलतीचे मासिक पास उपलब्ध झाले आहेत. देशात पहिल्यांदाच मेट्रोने पूर्णपणे मोबाईल अॅपवर पास सुविधा सुरू केली आहे.
शुक्रवार, 28 नोव्हेंबरपासून, मुंबई मेट्रो लाईन 3 च्या प्रवाशांना फेऱ्यांवर आधारित पासवर विशेष सवलत मिळणार आहे. यामध्ये 60 फेऱ्यांसाठी काढलेल्या पासवर 15 टक्के सवलत तर 45 फेऱ्यांसाठीच्या पासवर 10 टक्के सवलत अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे.
मुंबई-ठाण्यात 9 मेट्रो प्रकल्पांना गती! राज्य सरकारकडून 500 कोटींचे बिनव्याजी कर्ज; कोणत्या मार्गांचा समावेश, पाहा
या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीस्कर करणे आहे. प्रवासी हे पास MetroConnect3 अॅपवरूनच खरेदी करून त्याचा वापर करू शकतील. त्यामुळे कागदी तिकीट किंवा फिजिकल पासची गरज लागणार नाही. सध्या ही सुविधा फक्त अॅपद्वारे उपलब्ध असली, तरी लवकरच ती NCMC कार्डांवरही उपलब्ध होणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.”MetroConnect3 अॅप Android आणि iOS दोन्हीवर डाउनलोड करता येईल. त्यामुळे प्रवासी सहजपणे त्यांचा प्रवास नियोजित करून भरणा करू शकतील,” असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात एमएमआरसीने दिव्यांग प्रवाशांसाठी 25 टक्के सवलतीच्या ट्रिप पासची सुविधा MetroConnect-3 अॅपवर सक्रिय केली. मात्र सध्या ही सुविधा फक्त iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, कारण Google कडून अपडेटसाठी मंजुरीची प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळाल्यानंतर Android वापरकर्त्यांनाही ही सवलत उपलब्ध होईल.
ठाकरे बंधूंच्या भेटीत काय घडलं? पत्रकारांच्या प्रश्नावर संदीप देशपांडेंनी काय दिलं उत्तर
एमएमआरसीने सांगितले की, ही सुविधा दिव्यांग प्रवाशांचा खर्च कमी करणे आणि प्रवास अधिक सोयीस्कर करणे या उद्देशाने दिली आहे. Apple डिव्हाइस वापरणारे प्रवासी लगेचच सवलतीचे ट्रिप पास बुक करू शकतात. Android वापरकर्त्यांना ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल, असे आश्वासन देत एमएमआरसीने त्यांना अॅपचे अपडेटेड व्हर्जन ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
