Couple make fake AI Pass: मुंबईत एआय (AI) वापरून बनवलेला बनावट एसी लोकल पास वापरणाऱ्या महिलेला पकडण्यात आले. मध्य रेल्वेच्या टीटीईने हा प्रकार उघडकीस आणला. पती इंजिनियर असून त्याने पत्नीसाठी हा पास तयार केला होता. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसी लोकलमध्ये समोर आला प्रकार
मध्य रेल्वेच्या कल्याण–दादर एसी लोकलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. मध्य रेल्वेचे सतर्क टीसी विशाल नवले यांनी बुधवारी हा बनावट पासचा प्रयत्न उधळून लावला. आरोपी गुडिया शर्मा (28) यांनी अधिकृत UTS मोबाईल अॅपवर पास उघडत नसल्याचे सांगून, त्याऐवजी ब्राउझरवरील लिंक दाखवली. त्या पासवरील QR कोडही काम करत नव्हता.
ॲक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ मोबाईल ॲपवरून पासवर मिळणार विशेष सवलत; पाहा कशी असेल सुविधा
नवले यांना संशय आला आणि त्यांनी त्याची पडताळणी केली. सीआर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यावर समजले की त्या तिकीट क्रमांकाचा संबंध फेब्रुवारीमध्ये जारी झालेल्या आणि आता कालबाह्य झालेल्या एका पासशी असून, तो तिच्या पती ओमकार शर्मा (30) यांच्या नावावर होता. गुडियाला ताब्यात घेऊन कल्याण जीआरपीकडे सोपवण्यात आले.
इंजिनियरने कोडिंग करून बनवला पास
ओंकार, एक इंजिनियर आहे, त्याने कोडिंग कौशल्य आणि एआय टूल्स वापरून हा बनावट पास तयार केल्याची कबुली दिली आणि तो आपल्या पत्नीला दिला, जी एका खाजगी बँकेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करते. पोलिसांनी सांगितले की या जोडप्याचा बनावट डिजिटल पास तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटशी संभवित संबंध असू शकतो. रेल्वे अधिकाऱ्यांनी नवले यांच्या सतर्कतेचे कौतुक केले, कारण या वेळीच उघड झालेल्या प्रकारामुळे महसुलाचे नुकसान टळले आणि एआयद्वारे बनावट पास तयार करण्याचा नवा प्रकारही उघडकीस आला.
ठाकरे बंधूंच्या भेटीत काय घडलं? पत्रकारांच्या प्रश्नावर संदीप देशपांडेंनी काय दिलं उत्तर
मध्य रेल्वेने प्रवाशांना परवानाधारक काउंटर, एटीव्हीएम किंवा अधिकृत UTS अॅपद्वारेच तिकीट खरेदी करण्याचे आवाहन केले असून, बनावट तिकिटावर प्रवास करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी सात वर्षांपर्यंतची कैद, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असा इशारा दिला आहे.
